Share

‘पंढरीची वारी झाल्यावर देशातील नव्हे जगातील कोरोना नामशेष होईल’

Published On: 

सांगली : पायी वारी सोहळ्याला परवानगी द्यावी अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिलं आहे. आषाढी वारीला परवानगी द्या. वारी होत नसल्याने कोरोना वाढत आहे. वारीला परवानगी द्या कोरोना जाईल. त्यामुळे वारीला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी संभाजी भिडे गुरूजी यांनी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

या मागणीसाठी संभाजी भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली वारकरी संप्रदायाचे प्रमुख आणि शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना निवेदन दिले. पंढरीची वारी झाल्यावर देशातील नव्हतेतर जगातील कोरोना आटोक्यात नाहीतर नामशेष होईल. संतांच्या परंपरा जपल्याने सगळी काही विघ्नं नाहीशी होतात. त्यामुळे पायी वारी करण्यास परवानगी द्यावी असं या निवेदनात म्हटले आहे.या बरोबरच मानाच्या पालख्यांचे वाहनातून प्रस्थान न करता मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत पायी वारी झाली पाहिजे, अशी मागणीही भिडे यांनी केली आहे.

आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर अशा पायी  वाऱ्या करणारे लाखो वारकरी आहेत. वर्षानुवर्षे ही परंपरा आहे.गेल्या वर्षी कोरोनामुळे वारीची परंपरा खंडीत झाली आहे. परंतु, यावर्षी पंढरीच्या वारीसाठी वारकरी उत्सुक होते. राज्यातील काही जिल्हे वगळता कोरोना संसर्ग कमी आहे. राज्यातील इतर सर्व राजकीय कार्यक्रम सुरु आहेत. या पार्श्वभुमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन वारकऱ्यांनी वारीमध्ये सहभागी होण्याचे मान्य केले होते. असे असताना चर्चेचे निमित्त करून केवळ शंभर जणांना घेऊन पालख्या निघाव्यात असे आश्वासन दिले होते.

प्रत्यक्षात मात्र शंभर जणांची पायी वारीही अमान्य करून पुन्हा बसनेच संताच्या पादुका पंढरपूरपर्यंत नेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. हा शासनाकडून  वारकऱ्यांचा विश्वासघात असून ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी शासनाचा विरोध झुगारुन पायीच वारी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे फलटण येथे त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. या वारकरी सांप्रदायकडून निषेध करण्यात येतो. पंढरपूर वारीची परंपरा खंडीत होवूनये यासाठी पायी दिंडीला परवानी द्यावी असे या निवेदनात म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!