Share

गीलच्या जागी द्रविडच्या ‘या’ शिलेदाराची वर्णी लागेल का?

Published On: 

इंग्लंड : डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या पराभवामुळे कोट्यावधी भारतीय चाहत्यांची मने मोडली. या महान सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या विजयाबद्दल मोठे दावे केले जात होते. पण डब्ल्यूटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्युझीलंडने भारताचा ८ गडी राखुन पराभव करत विजेतेपद पटकावले.

या सामन्यानंतर आता भारतीय संघाला ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात इंग्लंड संघासोबत पाच कसोटी सामन्याची मालिका खेळायची आहे. त्या आधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा ओपनर शुभमन गिल दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही टेस्ट खेळू शकणार नाही. शुभमन गिल 5 टेस्ट मॅचच्या सीरिजमधल्या सुरुवातीच्या काही सामन्यांमधून बाहेर झाला आहे. त्यामुळे आता गिलच्या जागी श्रीलंका दौऱ्यावरील टीम इंडियाचा कोच राहुल द्रविडच्या खास शिष्याला टीम इंडियात संधी मिळण्याची शक्यता आहे.

बंगालचा ओपनिंग बॅट्समन अभिमन्यू इश्वरन हा इंग्लंड दौऱ्यावर स्टँडबाय म्हणून गेला आहे. गिल या सीरिजमधून आऊट झाल्यास त्याची टीम इंडियात निवड होऊ शकते. अभिमन्यू इश्वरन राहुल द्रविड आपला ‘आयडॉल’ मानतो. एका मुलाखतीदरम्यान त्याने सांगितले होते की, ‘राहुल सर माझी प्रेरणा आहेत. इंडिया ए टीममध्ये माझी निवड झाली तेव्हा ते कोच होते. मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं, हे माझं भाग्य आहे.’ यावर्षीच्या आयपीएलमध्ये कोणत्याही टीमनं अभिमन्यूला खरेदी केले नव्हते त्यामळे तो निराश झाला होता. मात्र त्यानंतर त्याची थेट इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झाली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!