🕒 1 min read
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशासह राज्यभर थैमान घातले आहे. त्यामुळे राज्यभर अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू आहेत. धार्मिक कार्यक्रमांना मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली आहे. याचाच परिणाम आता महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेला आषाढी वारी सोहळ्यावर देखील झाला आहे.
महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेला आषाढी वारी सोहळा यंदाच्या वर्षीही करोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे. यंदा वारीसाठी केवळ १० पालख्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. तर पायी वारीला परवानगी देण्यात आली नाहीये. असा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. या निर्णयाला देहू, त्याचबरोबर आळंदी देवस्थाननंही विरोध करत नाराजी व्यक्त केली होती. मात्र वारीसाठी काही दिवस शिल्लक असताना नियोजनासाठी घेतलेल्या बैठकीत दहाही संस्थानांच्या विश्वस्तांनी शासनाच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.
तर, हा निर्णय संस्थानांनी नाईलाजाने स्विकारला असला तरी तो वारकरी संप्रदायाला मान्य नाही. अनेक वारकरी संघटनांनी पायीच वारी करण्याचा इशारा दिला आहे. पायी वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे राज्य सरकारने नियमावली आखून कोरोना नियमांच्या पालनासह पायी वारीला परवानगी द्यावी अशी मागणी काही वारकरी संघटनांसह भाजपने केली आहे.
दरम्यान, भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी आज पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ‘यंदाची आषाढीची पायी वारी कोणत्याही परिस्थितीत होणार म्हणजे होणारच. सत्तेच्या नशेत धुंद असलेल्या राज्य सरकारने वारकऱ्यांची मागणी धुडकावली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी,’ असा इशारा तुषार भोसले यांनी दिला आहे.
पायी वारी करणाऱ्यांची भाषा फक्त वारकरीच करू शकतात. वारकऱ्यांमध्ये एक शिस्त व विनम्रता असते. मात्र वारकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अनेक (टप्परछाप )आचार्य सध्या मस्तीची भाषा करून वारकरी संप्रदायाला बदनाम करत आहेत. याबाबत तुकोबारायांनी "तुका म्हणे तोचि वेडा " असे लिहिले आहे.
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 30, 2021
यावर आता राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलंय. ‘पायी वारी करणाऱ्यांची भाषा फक्त वारकरीच करू शकतात. वारकऱ्यांमध्ये एक शिस्त व विनम्रता असते. मात्र वारकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अनेक (टप्परछाप )आचार्य सध्या मस्तीची भाषा करून वारकरी संप्रदायाला बदनाम करत आहेत. याबाबत तुकोबारायांनी “तुका म्हणे तोचि वेडा” असे लिहिले आहे,’ असा टोला मिटकरी यांनी अप्रत्यक्षपणे तुषार भोसले यांना लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आघाडीत मोठे वाद आणि संशय; शिवसेनेनं भाजपसोबत युती करून मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावे’
- ‘केंद्राच्या परवानगीनंतरच सगळी कामे करता का?’, हायकोर्टाने ठाकरे सरकारला झापले
- ‘अजित पवार तुम्हाला कोणीच वाचवू शकत नाही; २०२४ च्या पराभवाआधीच तुम्ही जेलमध्ये असाल’
- राजस्थान भाजपमधील अंतर्गत वादाचा कॉंग्रेसला होतोय चांगलाच फायदा
- पुणे झालं अजून मोठं; शहराच्या हद्दीत तब्बल २३ गावांचा झाला समावेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
