🕒 1 min read
इंग्लंड : डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या पराभवामुळे कोट्यावधी भारतीय चाहत्यांची मने मोडली. या महान सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या विजयाबद्दल मोठे दावे केले जात होते. पण डब्ल्यूटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्युझीलंडने भारताचा ८ गडी राखुन पराभव करत विजेतेपद पटकावले.
या सामन्यानंतर आता भारतीय संघाला ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात इंग्लंड संघासोबत पाच कसोटी सामन्याची मालिका खेळायची आहे. त्या आधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा ओपनर शुभमन गिल दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही टेस्ट खेळू शकणार नाही. शुभमन गिल 5 टेस्ट मॅचच्या सीरिजमधल्या सुरुवातीच्या काही सामन्यांमधून बाहेर झाला आहे.
जरी शुभमन सुरुवातीच्या काही सामन्यांमधून बाहेर असला तरी देखील तो मायदेशी जाणार नाही. तो टीम इंडियासोबत इंग्लंडमधेच राहणार आहे. टेस्ट सीरिजदरम्यान तो पुन्हा फिट होईल, अशी शक्यता प्रशासनाकडून वर्तवली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आघाडीत मोठे वाद आणि संशय; शिवसेनेनं भाजपसोबत युती करून मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावे’
- ‘केंद्राच्या परवानगीनंतरच सगळी कामे करता का?’, हायकोर्टाने ठाकरे सरकारला झापले
- ‘अजित पवार तुम्हाला कोणीच वाचवू शकत नाही; २०२४ च्या पराभवाआधीच तुम्ही जेलमध्ये असाल’
- मुस्लिमांसाठी त्वरित आरक्षण लागू करा; प्रकाश आंबेडकरांनी सरकारला दिला अल्टिमेटम
- ‘टप्परछाप आचार्य सध्या मस्तीची भाषा करून वारकरी संप्रदायाला बदनाम करतायत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
