Share

अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या गाडीचा भीषण अघपात, अपघातानंतर भावूक पोस्ट शेअर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री किशोरी शहाणे (Kishori Shahane) यांच्या गाडीला अपघात (Car Accident) झाला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये ही घटना घडली आहे. गाडीला अपघात झाला असला तरी त्या सुखरूप असल्याची माहिती त्यांनी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

दरम्यान किशोरी शहाणे -वीज सोशल मीडियावर (Instagram)  सक्रीय असतात. मात्र नुकतच त्यांनी इन्स्टाग्रामवर केलेली एक पोस्ट मात्र चाहत्यांचा हृदयाचा ठोका चुकवणारी ठरली आहे. किशोरी शहाणे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गाडीला अपघात झाल्याची माहिती शेअर केली आहे.

सोबतच गाडीचा ही फोटो शेअर केला असून स्वत: सुखरूप असल्याचं ही सांगितली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये ही घटना घडली आहे. अपघाताबद्दल सविस्तर अशी की, त्या एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र त्यांनी शेअर केलेल्या या पोस्टमधील फोटो पाहता त्यांच्या गाडीचं मोठं नुकसान झाल्याचं दिसतंय.

“जाको राखे साइयां…” इन्स्टाग्राम पोस्ट

किशोरी शहाणे-वीज यांनी फेसबुक पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली आहे. “आमच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात आमच्या कारचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र सुदैवाने आमचा जीव वाचलाय देवाच्या आशीर्वादाने आम्ही सुखरूप आहोत. “जाको राखे साइयां मार सके न कोय…” असं म्हटलंय.

https://www.instagram.com/p/CZlxSo3L25N/?utm_source=ig_web_copy_link

किशोरी शहाणे यांनी अनेक चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या आहेत. किशोरी यांनी आत्तापर्यंत ७० पेक्षा अधिक मराठी, हिंदी चित्रपटांमधून तसेच टीव्ही सीरियल्समधून भूमिका केल्या आहेत. बिग बॉस मराठी (Big Boss Marathi) या रिअॅलटी शोच्या एका सिझनमध्येही त्या सहभागी झाल्या होत्या.

 महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!