मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार युपीएचे नवे अध्यक्ष होणार असल्याची चर्चा गुरुवारी दिल्लीत रंगली होती. राहुल गांधी जबाबदारी घेण्यास तयार नसल्याने शरद पवार यांच्या नावाची चर्चा असून त्यांच्याकडे युपीएचं अध्यक्षपद सोपवलं जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. लवकरच शरद पवार युपीएचं अध्यक्षपद स्वीकारतील असा दावाही केला जात आहे.
यावर आता भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजेच युपीएचे अध्यक्ष झाले तरी भाजपाला त्या निवडीचा काहीही फरक पडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप मजबूत आहे, मोदींचं नेतृत्व सक्षम आहे. मात्र, शरद पवार यांच्या नेतृत्वाचा युपीएला निश्चितच फायदा होईल. पवार यांचा अनुभव मोठा आहे, त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबतचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत. त्यांच्या सोशल इंजिनिअरींगचा ते युपीएला फायदा करुन देऊ शकतात. पण, याची आम्हाला चिंता नाही. कारण, भाजपाला काहीही फरक पडणार नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
मात्र दुसरीकडे मी यूपीएचं नेतृत्व करणार या बातमीत तथ्य नाही, असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी एबीपी माझा या वृत्तावाहिनीशी बोलताना दिले आहे. तर या बातमीचं खंडन करत यामध्ये तथ्य नसल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ता महेश तपासे म्हणाले, यूपीएच्या प्रमुख पदावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची नियुक्ती होणार अशा आशियाच्या चुकीच्या बातम्या काल दिवसभर वृत्तवाहिन्यांवर झळकत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक गोष्ट स्पष्ट करु इच्छिते कि यूपीए मधील घटक पक्षांमध्ये अशा प्रकारचा कुठलाच प्रस्ताव नाही व कुठली चर्चा देखील झालेली नाही.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरलं; ममता बॅनर्जी सूडाच्या भावनेने काम करत आहेत : राज्यपाल
- महिलेला राज्यचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली, तर कौतुकच – पंकजा मुंडे
- नवीन वर्षात बँकेच्या आणखी एका नियमामध्ये बदल बँक ग्राहकांसाठी हिताचा निर्णय !
- मुंबईकरांचा लोकल प्रवास थेट पुढच्या वर्षीच? आयुक्तांचे संकेत
- शेतकरी संघटनांशी संवाद साधण्यासाठी केंद्र सरकारची दारे सदैव खुली आहेत – नरेंद्र सिंह तोमर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

