नवी दिल्ली :कृषी कायद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या संघर्षामुळे ऐन थंडीत देखील देशात वातावरण तापलं आहे. केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 15 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही.
दरम्यान, या आंदोलनाला देशाच्या विविध भागातून पाठींबा मिळत आहे. आज या आंदोलनाचा ११ वा दिवस आहे. शेतकरी सध्या दिल्ली सीमेवर आंदोलन करत असून देशातील विविध क्षेत्रातून पाठिंबा मिळत आहे. सिनेकलाकार, राजकीय नेते अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान, केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण, रेल्वे व वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्यासह केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण, ग्रामविकास व पंचायती राजमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना संवाद सुरू ठेवण्याचे आणि एक समाधानकारक तोडगा काढण्याचे आवाहन करताना कृषी कायद्यांविषयी शेतकऱ्यांच्या चिंता दूर करण्यासाठी प्रस्तावात दिलेल्या विविध सूचनांची माहिती दिली. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलत होते.
शेतकरी उत्पादन व वाणिज्य (प्रोत्साहन व सुलभता) कायदा 2020 आणि शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण) किंमत हमी करार आणि कृषी सेवा कायदा 2020 आणि अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती कायदा 2020 या देशातील आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या कृषी सुधारणा आहेत. या सुधारणांमुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेचे स्वातंत्र्य मिळेल, उद्योजकतेला प्रोत्साहन, तंत्रज्ञानाची उपलब्धता मिळेल आणि ते शेतीमध्ये परिवर्तन घडवून आणतील.
ते म्हणाले की केंद्र सरकार एमएसपी आणि खरेदीबाबत आश्वासन देण्यास तयार आहे. विद्यमान एपीएमसी मंडीच्या आत आणि बाहेर व्यवहाराची समान संधी निश्चित करण्यास सरकार तयार आहे. एसडीएम न्यायालयाव्यतिरिक्त शेतकरी नागरी न्यायालयासमोर वाद-तंटे घेऊन येऊ शकतात असे सांगून पाचट जाळल्याबद्दल दंड व प्रस्तावित वीज दुरुस्ती विधेयक संबंधित चिंता सोडविण्यासाठी सरकार तयार आहे. नवीन कृषी कायद्यांतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनीचे रक्षण करण्यात येईल, असेही आश्वासन दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- काय सांगताय? २४ तासांत होणार कोरोनाचा नाश!, प्रभावी औषध शोधण्यास शास्त्रज्ञांना यश
- राहुल गांधींविरोधात रचलं जातंय मोठं षडयंत्र? जाणून घ्या नेमका काय आहे प्रकरण …
- ‘नवीन संसद भवनाचे भूमिपूजन म्हणजे अंत्यसंस्कारावेळी डीजे वाजवण्यासारखं आहे’
- …अन्यथा मुंबईत नाईट कर्फ्यू लागू करावा लागेल; आयुक्तांची मुंबईकरांना ताकीद
- शेतकरी आंदोलनामुळे हरियाणातील भाजप सरकार संकटात; राजकीय वादळाची शक्यता


