🕒 1 min read
मुंबई : गेल्या महिन्यात मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जेष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या ‘कर्तृत्वान मराठा स्त्रिया’ या पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं होत. या पुस्तिकेचं प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रकाशन कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार आशिष शेलार हे देखील उपस्थित होते.
यावेळी बोलताना आशिष शेलार यांनी एक महत्त्वाचं विधान केलं होत. महाराष्ट्रतील कर्तृत्ववान मराठा स्त्रियांवर मुंबई विद्यापीठात संशोधन होण्याची गरज आहे असं म्हणत राज्यात कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, अशी आशा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केली होती. "संदर्भ पुन्हा अनचॅलेंज राहू नये म्हणून, जर विषय मुख्यमंत्रिपदाचा असेल, तर पवारसाहेब, कर्तृत्त्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, अशी अपेक्षा बाळागणारा समाजात मोठा वर्ग आहे, त्याला माझ्यासारख्या माणसाचं सुद्धा समर्थन असू शकतं", असं भाजप आमदार आशिष शेलार म्हणाले होते.
यावर आता भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आपल मत व्यक्त केलं आहे. कोणत्याही राज्यात महिलेला नेतृत्वाची संधी मिळाली, तर कौतुकच आहे. अस पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. तर, कुठल्या पक्षातून महिलेला संधी मिळणार, हा मुद्दा वेगळा असल्याचे देखील मुंडे म्हणाल्यात. दरम्यान भाजपमध्ये अत्यंत सक्षम महिला असल्याचं देखील सांगायला पंकजा मुंडे विसरल्या नाहीत. टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडे यांनी हे मत व्यकर केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पवार साहेबांची निवड होणार हे समजताच भाजप नेत्यांच्या उरात धडकी भरली’
- खडसेंपाठोपाठ भाजपचा आणखी एक शिलेदार राष्ट्रवादीच्या वाटेवर?
- २६/११ च्या दहशतवाद्याला संयुक्त राष्ट्राकडून खर्चासाठी दर महिना दीड लाख रुपये मंजूर !
- पब, पार्टी गॅंगमुळे मुंबईत नाईट कर्फ्यू लावण्याची वेळ; शेलारांचा आदित्य ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- दिल्ली काबीज करायला शेतकऱ्यांची कूच, अमृतसरहून ७०० ट्रॅक्टर – ट्रॉली दिल्लीकडे निघाले


