🕒 1 min read
मुंबई: लॉकडाऊन नंतर बँकिंग क्षेत्रामध्ये अनेक बदल झाले आहेत. त्यामध्ये ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, बँक व्यवहार आणि बँक व्यवहारांवर आकारले जाणारे अनेक शुल्क देखील वाढले आहेत. त्यांनतर बँकिंग नियमांमध्ये आणखी बदल झाला तो कोरोना मुळे करण्यात आलेल्या लॉक डाऊन दरम्यान या काळामध्ये बँक ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन बँकिंग, कॅशलेश व्यवहार करण्यात आले. आता बँकेच्या आणखी एका नियमामध्ये बदल करून ग्राहक हिताचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाच्या संकटामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये बँकिंग क्षेत्रातील घोटाळे (Banking Fraud) मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. अशात ग्राहकांची होणार फसवणूक थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1 जानेवारी 2021 पासून धनादेशासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम लागू करण्याची शक्यता आहे. यामुळे नवीन वर्षात चेक पेमेंटशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल होणार असल्याची माहिती आहे. खोट्या चेकद्वारे होणारा बँकिंग घोटाळा रोखण्यासाठी हा बदल करण्यात येणार आहे.
या सुविधेमध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 50,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे देण्यासाठी रक्कम चेकद्वारे सुनिश्चित करणं महत्त्वाचं असणार आहे. या सिस्टमच्या माध्यमातून चेकला एसएमएस मोबाइल अॅप टरनेट बँकिंग आणि एटीएम द्वारे दिला जाऊ शकतं. ग्राहकांची होणार फसवणूक थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) 1 जानेवारी 2021 पासून धनादेशासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम लागू करण्याची शक्यता आहे.
पॉझिटिव्ह पे सिस्टमअंतर्गत जो धनादेश देईल त्याला चेकची तारीख, लाभार्थ्याचे नाव, प्राप्तकर्त्याचे नाव आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देयकाची रक्कम सांगावी लागणार आहे. व्यक्ती एसएमएस, मोबाइल अॅप, इंटरनेट बँकिंग किंवा एटीएम सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे ही माहिती देऊ शकतो.
यानंतर चेक पेमेंट करण्यापूर्वी या माहितीची उलट तपासणीदेखील केली जाईल. ज्यामध्ये काही त्रुटी असल्यास चेक सिस्टम तपासाण्यात येईल. जर यामध्ये काही गडबड झाली तर ‘चेक ट्रंकेशन सिस्टम’ त्याला अधोरेखित केलं जातं आणि तशी बँकेला महत्त्वाची माहिती पुरवली जाते.
50 हजार किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम असल्यास बँक खातेदारांसाठी नवीन नियम लागू करतील. इतकंच नाही तर या सुविधेचा लाभ घेण्याचा निर्णय हा खातेधारकांचा असेल. पण वारंवार समोर येणारे घोटाळे पाहता बँका 5 लाख आणि त्यापेक्षा अधिक धनादेशांच्या बाबतीत हे अनिवार्य करू शकतात.
महत्वाच्या बातम्या
- देशातील असंतोष विझविण्याऐवजी तो भडकलेला ठेवण्यात सरकारला रस आहे : शिवसेना
- तृप्ती देसाईंना शिर्डीमध्ये प्रवेशबंदी! शिर्डी पोलीसांनी तृप्ती देसाईंना दिली नोटीस
- मराठा आरक्षण : सरकार मराठा समाजाची थट्टा करत आहे : समरजितसिंह घाटगे
- काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून राज्य सरकार पडणार; केंद्रीय मंत्र्याचा दावा
- खा. शरद पवारांच्या नावाने महाविकास आघाडी सरकार लागू करणार योजना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

