Share

राज्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरलं; ममता बॅनर्जी सूडाच्या भावनेने काम करत आहेत : राज्यपाल

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील राजकारणाला हिंसक वळण मिळालं आहे. भाजपचा वाढता प्रभाव पाहून तृणमूलचे नेते आणि कार्यकर्ते घाबरले आहेत कि काय असा सवाल उपस्थित होत आहे. कारण आजपर्यंत भाजपचे कार्यकर्ते आणि आमदार-खासदारांवर हल्ले झाल्याचे पाहायला मिळत होते पण काल चक्क भाजपाध्यक्ष जे पी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची केंद्र सरकारने गंभीरपणे दखल घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वत: या हल्ल्याचा निषेध नोंदवला असून पश्चिम बंगालच्या राज्यापालांना याबाबतचा रिपोर्ट पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, आपले लोकतंत्र अमूल्य असून पश्चिम बंगाल मध्ये शांतता राहावी अशी आपली इच्छा असून तिथे झालेल्या हिंसक घटनेची आपण निंदा करत असल्याचं पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. राज्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरलं असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सूडाच्या भावनेने काम करत असल्याचं धनखड यावेळी म्हणाले. राज्यसरकारच्या कामात पारदर्शकतेचा अभाव असल्याचं सांगत राज्य सरकार आपल्याला कोणतीही माहिती देत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी १९ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा पश्चिम बंगालला भेट देण्याचा निर्णय घेतलाय. या दौऱ्यात ते दोन दिवस बंगालमध्ये राहणार आहेत. केवळ दीड महिन्याच्या कालावधीत अमित शहांचा हा दुसरा पश्चिम बंगाल दौरा ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!