मुंबई : कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी राज्यासह देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. या काळात सार्वजनिक वाहतूक देखील पूर्णपणे बंद करण्यात आली होती. तर, मुंबईकरांची लाईफलाइन असलेल्या लोकलची सेवा देखील या काळात बंद करण्यात आली होती. जूनमध्ये काही प्रमाणात लॉकडाऊन उठवल्यानंतर अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु करण्यात आली होती.
यानंतर, राज्य सरकारने महत्वाचं पाऊल उचलत सामान्य महिलांसाठी लोकलचा प्रवास सुरू करून नवरात्रोत्सवाची भेट दिली. मात्र, लोकलने प्रवास करण्याच्या वेळेची मुभा फारशी उपयोगी नसल्याची प्रतिक्रिया अनेक महिलांनी दिली होती. तर, सर्वांसाठी लोकलसेवा सुरु करण्यासाठी ही एक प्रकारची चाचणी असल्याचे बोललले जाऊ लागले होते.
दिवाळीनंतर राज्य सरकार मुंबईकरांना दिलासा देऊ शकते अशी शक्यता होती. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट व वाढती रुग्णसंख्या यामुळे लोकलसेवेसाठी सामान्यांना प्रतीक्षा पाहावी लागली होती. दरम्यान, याकाळात अनेक नव्या तारखा, बैठका यांच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, आता मुंबईकरांना यंदाच्या वर्षी दिलासा मिळणार नसल्याचं समोर येत आहे.
‘मुंबईतील करोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांना प्रचंड कष्ट घ्यावे लागले आहेत. महापालिकेचे करोना योद्धे दिवसरात्र एक करून काम करत आहेत. सुरक्षेचे नियम पाळले जावेत यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत कुठलाही निर्णय घाईने घेऊन आतापर्यंतच्या कामावर बोळा फिरवण्याची इच्छा नाही.’ असं मुंबईचे आयुक्त इकबाल चहल यांनी सांगितलं आहे
तर, ख्रिसमस आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनची परिस्थिती पाहून, त्यानंतरच सर्वसामान्यांसाठी उपनगरीय रेल्वे गाड्या सुरू करता येतील का, याविषयी आम्ही राज्य सरकारला शिफारस करू, असं देखील चहल यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे, येत्या १५ डिसेंबरला लोकल सुरु होणार अशा आशेवर असलेल्या मुंबईकरांना पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पवार साहेबांची निवड होणार हे समजताच भाजप नेत्यांच्या उरात धडकी भरली’
- खडसेंपाठोपाठ भाजपचा आणखी एक शिलेदार राष्ट्रवादीच्या वाटेवर?
- २६/११ च्या दहशतवाद्याला संयुक्त राष्ट्राकडून खर्चासाठी दर महिना दीड लाख रुपये मंजूर !
- पब, पार्टी गॅंगमुळे मुंबईत नाईट कर्फ्यू लावण्याची वेळ; शेलारांचा आदित्य ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- दिल्ली काबीज करायला शेतकऱ्यांची कूच, अमृतसरहून ७०० ट्रॅक्टर – ट्रॉली दिल्लीकडे निघाले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

