मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवले आहे. यासंदर्भातील ठाकरे सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणार राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. हा ठाकरे सरकारसाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे.
हे आरक्षण रद्द झाल्यानंतर आता ओबीसी समाजातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडी सरकार आरक्षणविरोधी असून मागासवर्गावर अन्याय केला जात आहे, अशी तिवक भाजप नेत्यांनी केली होती. दरम्यान, ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी भाजपने आंदोलनाची तयारी केली असून आज मुंबईत भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीला पंकजा मुंडे, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, योगेश टिळेकर आदी नेते उपस्थित होते. सुमारे तीन तास ही बैठक चालली.
दरम्यान, राज्य सरकारने ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला घटनात्मक अटींच्या पुर्तते अभावी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर आता राज्य सरकारला हे आरक्षण टिकवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने सखोल माहिती म्हणजेच इंपेरिकल डाटाची मागणी केली आहे. या मागणीवर पंकजा मुंडे यांनी सडकून टीका केली आहे. केंद्राकडे केलेली ही मागणी म्हणजे नौटंकी असल्याचा घणाघात मुंडेंनी केला आहे. भाजपच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
‘राज्य सरकार नौटंकी करत आहे. दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. इम्पिरिकल डेटाचा आणि केंद्राचा काहीच संबंध नाही. राज्य सरकारने हा विषय हाताळायचा आहे,’ असं मुंडे म्हणाल्या. तसंच, ‘ जोपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत राज्यात कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही. तसा निर्णयच आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे,’ अशी गर्जना पंकजा मुंडे यांनी केली आहे. त्यामुळे मराठा आरक्षण, पदोन्नती आरक्षण आणि आता ओबीसी आरक्षण असा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच तापल्याचं पाहायला मिळतंय.
महत्वाच्या बातम्या
- ‘कोरोना काळात आर्थिक स्थिती ढासळली ; त्यात मालमत्ता करवाढीचा बोजा टाकणार नाही’
- अखेर ठरलंच ! विधानसभेच्या अध्यक्षपदाबाबत राष्ट्रवादीच्या नेत्याने केलं महत्वाचं विधान
- ‘वाझे, शर्मा ‘हे’ धाडस करू शकतात ? या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वेगळाच’
- ‘माझ्या इतक्या चौकश्या झाल्या, तो राजकीय विषय नव्हता तर ‘हा’ कसा असेल’; खडसेंचा सवाल
- कुठे आणि कधी पाहता येणार WTC चा अंतिम सामना ?, वाचा सविस्तर


