Share

अखेर ठरलंच ! विधानसभेच्या अध्यक्षपदाबाबत राष्ट्रवादीच्या नेत्याने केलं महत्वाचं विधान

Published On: 

कोल्हापूर : महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसच्या पारड्यात पडलं. नाना पटोले यांच्याकडे विधानसभेचं अध्यक्षपद सोपवण्यात आलं होतं. यानंतर, काही महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या हायकमांडने काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ नाना पटोले यांच्या गळ्यात टाकली. यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधीच नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली.

यानंतर, विधानसभेचे नवे अध्यक्ष कोण असणार यावरून उत्सुकता निर्माण झाली होती. तर, विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे राहणार की अन्य पक्षाकडे जाणार यावरून महाविकास आघाडीमध्ये काही वाद देखील झाल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडेच अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. अर्थसंकलिपचे अधिवेशन देखील त्यांच्याच अध्यक्षतेखाली पार पाडलं. मात्र, भाजपने यावरून महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न केले होते.

आता पावसाळी अधिवेशन तोंडावर आलं असतानाच विधानसभेच्या अध्यक्षपदाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. अध्यक्षपदी नेमकी कोणाची वर्णी लागणार ? अधिकृत घोषणा कधी होणार ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी अध्यक्षांच्या निवडीबाबत महत्वाचं विधान केलं आहे. ‘विधानसभा अध्यक्षांची या अधिवेशनात निवड होईल,’ अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!