Share

‘वाझे, शर्मा ‘हे’ धाडस करू शकतात ? या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वेगळाच’

Published On: 

कोल्हापूर : एन्काउंटर स्पेशलिस्ट असलेले मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने काल अटक केली आहे. प्रदीप शर्मा यांच्या मुंबईतील अंधेरी परिसरातील घरावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापे टाकले. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवास्थानाबाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरेन प्रकरणात प्रदीप शर्मा एनआयएच्या रडारवर होते.

प्रदीप शर्मा यांना लोणावळ्यातील रिसॉर्टमधून त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. सहा तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. प्रदीप शर्मा यांना शिवसेना नेता म्हणून ओळखलं जातं. २०१९ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेनं त्यांना नालासोपारा मतदारसंघातून विधानसभेचं तिकीट दिलं होतं. मात्र, यात त्यांना प्रभाव स्वीकारावा लागला होता. आता शिवसेनेशी पूर्वसंबंध असलेल्या वाझेनंतर शर्मा यांना देखील अटक झाल्याने भाजप नेत्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

अशातच आता महाविकास आघाडीमधील मंत्र्याने आता या प्रकरणात शंका उपस्थित केली आहे. ‘अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक ठेवण्यात आली होती. त्या प्रकरणाचा तपास व्हावा हे मी नेहमी सांगत आहे, असं सांगतानाच सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा हे धाडस करू शकतात का? या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वेगळाच आहे,’ असं भाष्य राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!