जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजपमध्ये असताना बाजूला सारले गेल्याच दिसून आलं. फडणवीस सरकारच्या काळात एकनाथ खडसे यांच्याकडे महसूल खात्याचं मंत्रीपद होतं. मात्र, यानंतर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला आणि मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. फडणवीस सरकारने त्यांना क्लीनचित दिली असली तरी सध्या देखील त्यांना अनेक चौकशांना सामोरं जावं लागत आहे. त्यातच ईडीची भर पडली आहे.
आता बीएचार पतसंस्थेचा घोटाळा सध्या चर्चेचा ठरत आहे. आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणात राज्यभरात छापे टाकले. यावेळी 12 जणांना अटक करण्यात आली. अटक केलेल्या संशयितांमध्ये उद्योजक, व्यापाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी काहीजण भाजप नेते गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीयांपैकी असल्याचे समजते. दरम्यान, यामागे राजकीय सूडवृत्ती असल्याचा आरोप भाजपच्या गोटातून केला जात आहे.
यावर एकनाथ खडसे यांनी भाष्य केलं आहे. ‘बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहारात हजारो ठेवीदारांचा पैसा असुरक्षित झाला. त्यामुळे हजारो संसार उदध्वस्त झाले. आता या गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीला वेग आला आहे. त्यामुळे हा काही राजकीय विषय नाही. तो ठेवीदारांच्या संरक्षणाचा विषय आहे. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना शासन होईलच, मग तो लहान असो किंवा मोठा असो,’ असं खडसे म्हणाले.
पुढे त्यांनी स्वतःबाबत झालेल्या चौकशांचा पाढाच वाचून दाखवलाय. ‘माझी यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, आयकर विभाग, लोकायुक्त, दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी झाली आहे. आता सध्या सक्तवसुली संचालनालयाकडून देखील चौकशी सुरू आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नसताना माझ्या एवढ्या चौकश्या होऊ शकतात. तो राजकीय विषय नव्हता तर आता बीएचआर प्रकरणी सुरू असलेल्या कारवाईचा विषय राजकीय कसा असू शकतो,’ असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, ठेवीदारांचा कष्टाचा पैसा बुडाला असून याप्रकरणी योग्य कारवाई होऊन त्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- अजित पवारांच्या बैठकीदरम्यान घोषणाबाजी करणाऱ्या कंत्राटी परिचारिकांवर लाठीचार्ज
- ‘तुला प्रोटोकॉल कळतो का रे?’, अजित पवारांनी बीडच्या मुख्याधिकाऱ्यांना झापले
- ‘दोन चिल्लर पक्षांच्या छताखाली असलेला काँग्रेस फुटकळ कामाची जाहिरातबाजी करतोय’
- नितीन गडकरींना धक्का! अमरावतीचे डॉ.सुनील देशमुख काँग्रेसमध्ये
- कुठे आणि कधी पाहता येणार WTC चा अंतिम सामना ?, वाचा सविस्तर


