इंग्लंड : जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेला आज पासून सुरुवात होत आहे. सगळीकडे या सामन्याची उत्सुकता लागली आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंड दोन्ही संघ साउथहॅमप्टटनमध्ये आहेत. डब्ल्युटीसीच्या अंतिम सामन्यासाठी काही तसाच राहिले आहे.
भारतीय संघाने स्पर्धेच्या एक दिवस आधी जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या सामन्यासाठी ११ शिलेदारांची घोषणा केली. भारतीय क्रिकेट बोर्डाने या सामन्यासाठी खेळवण्यात येणाऱ्या ११ खेळाडूंची यादी जाहीर केली. अंतिम सामन्यात कर्णधार विराट कोहलीने सहा बॅट्समन आणि पाच बोलर्सच्या साथीने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने अनुभवी गोलंदाजांसोबत टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्याचं ठरवलं आहे.
आज दुपारी ठीक अडीज वाजता विराट आणि केन नाणेफेकीसाठी मैदानात जातील. आतापर्यंतच्या सगळ्यात प्रतिक्षेत असलेली नाणेफेक उडवली जाईल. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंडच्या अंतिम सामन्याला ठीक तीन वाजता होणार आहे.
या ठिकाणी पाहता येणार सामना
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी जग्गजेतेपदाच्या सामन्याला भारतीय प्रमाण वेळेनुसार ठीक तीन वाजता सुरुवात होणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स 1 आणि स्टार स्पोर्ट्सच्या इतर चॅनेलवर पाहू शकता. हिंदी आणि इंग्रजी कॉमेंट्रीचा आनंद तुम्ही घेऊ शकता.
कोण आहेत हे ११ शिलेदार ?
विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, आर. अश्विन, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी.
"This is not just good cricket over the last seven, eight months, this is hard work and toil for the last four, five years." ????
Hear what @imVkohli and Kane Williamson have to say ahead of leading their teams out in the #WTC21 Final ????#INDvNZ pic.twitter.com/62F3PNsqcH
— ICC (@ICC) June 18, 2021
महत्वाच्या बातम्या
- ‘…तरी न्यूझीलंड संघाला हलक्यात घेऊ नका’ ; दिग्गज फलंदाजाचा भारतीय संघाला सल्ला
- अजित पवार उस्मानाबाद दौऱ्यावर; माजी आमदार मोटेंची घेणार भेट
- अंतिम सामन्यात खेळण्याचं सिराजचं स्वप्न अधुरं
- ‘कोहलीचा संघ सर्वोत्तम खेळ करेल’ ; भारतीय संघ अंतिम सामना जिंकणार गांगुलींचा विश्वास
- न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी कर्णधार विराटाचे मोठे वक्त्यव्य, म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

