मुंबई : कोरोनामुळे गेल्या वर्षांपासून रखडलेली प्रस्तावित मालमत्ता करवाढ सन २०२१ ते २०२५ या कालावधीत करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून, तसा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आला. त्यास भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीने विरोध केल्याने हा प्रस्ताव रोखून धरण्यात आला आहे.
यावर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या कि, ‘कोरोना काळात सर्वांचीच आर्थिक स्थिती ढासळली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईची स्थिती पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत मुंबईकरांवर मालमत्ता कर वाढ लादणार नाही,’ असे स्पष्टीकरण महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहे.
‘कोरोनामुळे लाखो, कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. व्यवसाय, रोजगार बंद पडले आहेत. मुंबईकर आर्थिक संकटात सापडले आहेत. हे सर्व सुस्थितीत येण्यास किती काळ लागेल याची काही माहिती नाही. पण तोपर्यंत मुंबईकरांवर मालमत्ता कर दरवाढीचा बोजा टाकणार नाही,’ असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. २०१७च्या पालिका निवडणुकीत सेनेने ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली होती.
प्रत्यक्षात या करातील फक्त दहा टक्के सर्वसाधारण कर माफ झाला असून, उर्वरित कर मुंबईकरांना भरावा लागतो आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये आधीच नाराजी असताना, तब्बल १४ ते २५ टक्के प्रस्तावित करवाढीचा फटका निवडणुकीत सेनेला बसू शकेल, असा सावधगिरीचा इशारा ज्येष्ठ नगरसेवकांनी दिला आहे.
There will be no hike in Property tax in Mumbai till the #COVID situation continues. We don't know how long will it take but till then we will not burden Mumbaikars by increasing the property tax: Mumbai Mayor Kishori Pednekar
(File pic) pic.twitter.com/RN3Xpat8r5
— ANI (@ANI) June 18, 2021
कोरोनाचे संकट नसल्यास फेब्रुवारी २०२२मध्ये पालिकेची निवडणूक होणार आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजप ८२ तर आणि शिवसेना ८४ असे फक्त दोन नगरसेवकांचे संख्या बळ कमी होते. त्याची कसर येत्या निवडणुकीत भरून काढून कोणत्याही परिस्थितीत पालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजप वर्षभर आधीपासूनच पावले टाकत आहे. मालमत्ता करवाढ केल्यास भाजपला आयते कोलीत हाती मिळेल व निवडणुकीत तो प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा बनवला जाईल. अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना दिला सावध राहण्याचा सल्ला
- गूढ वाढले ; मायलेकरानंतर नदीच्या पाण्यात आढळला पतीचा मृतदेह
- ‘दोन चिल्लर पक्षांच्या छताखाली असलेला काँग्रेस फुटकळ कामाची जाहिरातबाजी करतोय’
- ‘माझ्या इतक्या चौकश्या झाल्या, तो राजकीय विषय नव्हता तर ‘हा’ कसा असेल’; खडसेंचा सवाल
- कुठे आणि कधी पाहता येणार WTC चा अंतिम सामना ?, वाचा सविस्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

