🕒 1 min read
मुंबई : नवाब मलिक यांची ८ तास चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी राज्यभरात गृहमंत्रालयाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. विरोधकांनी नवाब मलिक यांच्या अटकेची मागणी केली आहे. राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व अन्य महत्वाच्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली.
या बैठकीनंतर छगन भुजबळ म्हणाले, “मोठी दुर्देवाची गोष्ट आहे. नवाब मलिकांना ईडीने चौकशी करुन अटक केली. न्यायालयात दोन्ही बाजूने युक्तिवाद झाला. १९९२ सालची घटना वर काढण्यात आली. नवाब मलिक भाजप सरकारच्या विरोधात बोलतात, अन्यायाविरोधात बोलतात त्यामुळे त्यांचे तोंड बंद करण्याचा हा प्रकार आहे. मंत्र्यांवर दबाव आणण्याचा हा प्रकार आहे, हे लोकशाही विरोधात आहे. आम्ही या अन्यायाचा विरोध करत आहोत. उद्या १० वाजता मंत्रालयाच्या शेजारी महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आम्ही निषेध करणार आहोत. त्यानंतर राज्यभरात शांततेत आंदोलन करण्यात येणार आहे. जोपर्यंत दोष सिद्ध होत नाही. तोपर्यंत नवाब मलिकांचा राजीमाना घेण्याचा काही प्रश्न नाही.”
३० वर्ष या प्रकरणाची केस चालली, मात्र नवाब मलिकांची नाव कुठेही नव्हते. केंद्राच्या विरोधात बोलतात म्हणून त्यांच तोंड बंद करण्याचा हा प्रकार असल्याचे छगन भुजबळ म्हणाले.
नवाब मलिकांची आज पहाटेपासून ईडीकडून ८ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. दाऊदचा भाऊ इकबाल कासकर ईडीच्या कोठडीत आहे. त्याची नुकतीच चौकशी झाली. या चौकशीत कासकर आणि नवाब मलिक यांच्या कंपनीत जमीन व्यवहार झाल्याचे काही पुरावे ईडीला मिळाल्याचे सुत्रांची माहिती आहे. त्यामुळे नवाब मलिकांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
