🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. अंडरवर्ल्डशी निगडित जमीन खरेदी केल्याप्रकरणी नवाब मलिक यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. नवाब मलिकांची आज पहाटेपासून ८ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. दाऊदचा भाऊ इकबाल कासकर ईडीच्या कोठडीत आहे. त्याची नुकतीच चौकशी झालीय. या चौकशीत कासकर आणि नवाब मलिक यांच्या कंपनीत जमीन व्यवहार झाल्याचे काही पुरावे ईडीला मिळाल्याचे सुत्रांची माहिती आहे.
दरम्यान याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सरू आहे. यापुर्वी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची सिलव्हर ओकवर महत्वाची बैठक होत आहे. काँग्रेसचे मंत्री देखील शरद पवार यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे नवाब मलिक मंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, जयंत पाटील व अन्य नेते उपस्थित आहेत. साडेसहा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत देखील महत्वाची बैठक होणार आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात बोलताना नवाब मलिक यांना मंत्रिपदी राहण्याची गरज नाही. मलिक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, नाहीतर आम्ही आंदोलन करु, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. ज्या मंत्र्यांवर आरोप होऊन अटक होईल त्या सगळ्यांना राजीनामा द्यावा लागेल. अनेक मंत्री, नेते यांच्यावर गंभीर आरोप आहेत. मलिक यांची देहबोली म्हणजे गिरा तो भी टांग उपर आहे. नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
