🕒 1 min read
मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ८ तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक झाली आहे. भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी अनेक वेळा मलिक यांच्यावर आरोप केले होते. आज मलिकांच्या अटकेनंतर मोहित कंबोज यांच्या घरासमोर भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. त्यानंतर मोहित कंबोज यांनी जल्लोषात तलवार नाचवली. यावरून आता त्यांच्यावर पोलीस कारवाई होण्याची शक्यता आहे. पोलीस मोहीत कंबोज यांच्या घरी पोहोचले आहे.
समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर नवाब मलिक यांनी मोहित कंबोज यांच्यावर देखील गंभीर आरोप केले होते. त्यानंतर मोहित कंबोज यांनी मलिक यांच्यावर आरोपांची मालिका सुरू केली होती. आज मलिक यांना अटक झाली आहे. त्यानंतर भारतीय यांनी एकच जल्लोष केला आहे. मोहीत कंबोज यांनी फटाक्याची आतषबाजी होत असताना तलवार काढली. यावरून आता त्यांच्यावर पोलीस कारवाई होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
“नवाब मलिक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, नाहीतर…”; चंद्रकांत पाटलांचा इशारा
अटकेनंतर नवाब मलिकांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘लड़ेंगे, जीतेंगे और सबको एक्सपोस करेंगे’
नवाब मलिक मंत्रीपदाचा राजीनामा देणार? सिलव्हर ओकवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्वाची बैठक
रोहित शर्माने सांगितले ३ खेळाडूंचे नाव जे ठरू शकतात “भावी कर्णधार”


