🕒 1 min read
पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तसेच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांची ईडीने (ED) ८ तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली आहे. त्यांच्या अटकेनंतर आता राज्यातील राजकारण चांगलेच पेटले असल्याचे दिसत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यानी आता महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील नवाब मलिक अटक प्रकरणी भाष्य केलं आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, ईडीच्या अटकेनंतर नवाब मलिक यांना आता कॅबिनेट मंत्रीपदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही, असं मत व्यक्त केलं आहे. तसेच नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचं देखील चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
अटकेनंतर नवाब मलिकांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘लड़ेंगे, जीतेंगे और सबको एक्सपोस करेंगे’
नवाब मलिक मंत्रीपदाचा राजीनामा देणार? सिलव्हर ओकवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्वाची बैठक
रोहित शर्माने सांगितले ३ खेळाडूंचे नाव जे ठरू शकतात “भावी कर्णधार”
नवाब मलिकांच्या अटकेनंतर किरीट सोमय्यांचा गंभीर इशारा! म्हणाले, “आता तिसरा नंबर…”


