सोलापूर: सत्तेचा दुरुपयोग विरोधक कसा करतात हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तसेच अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेवर दिसत आहे, असा आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी करमाळा येथील परिसंवाद कार्यक्रमात बोलताना केला आहे. त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की आत्तापर्यंत विरोधकांनी सुडाचे चे राजकारण केले आहे. अनेक सरकारे आली आणि गेली कोणीही सत्तेवर आले तरी असे कायम टिकत नाही. सध्या सुडाचे राजकारण चालू आहे. विरोधात बोलणार्यांना एजन्सीच्या मार्फत अटक करून कारवाई करण्याचा प्रकार विरोधकांनी चालू केला आहे.
आमदार संजय मामा शिंदे यांच्या करमाळा येथील संपर्क कार्यालय समोर राष्ट्रवादी काँग्रेसची परिसंवाद आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या आढावा बैठकीत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. जयंत पाटील म्हणाले, नवाब मलिक यांच्या अटकेमुळे ते उद्विग्न झाल्याचे दिसत होते यावेळी जनता याबाबत योग्य ते निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या:
“नवाब मलिक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, नाहीतर…”; चंद्रकांत पाटलांचा इशारा
अटकेनंतर नवाब मलिकांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘लड़ेंगे, जीतेंगे और सबको एक्सपोस करेंगे’
नवाब मलिक मंत्रीपदाचा राजीनामा देणार? सिलव्हर ओकवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्वाची बैठक
रोहित शर्माने सांगितले ३ खेळाडूंचे नाव जे ठरू शकतात “भावी कर्णधार”
नवाब मलिकांच्या अटकेनंतर किरीट सोमय्यांचा गंभीर इशारा! म्हणाले, “आता तिसरा नंबर…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

