Share

‘१९९५ पर्यंत उद्धव ठाकरे कॅमेरा घेऊन जंगलात फिरत होते, युतीशी त्यांचा काय संबंध?’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बारामती येथे अटल इनक्युबेशन सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी २५ वर्ष मित्रपक्ष असलेल्या आणि आता विरोधात बसलेल्या भाजपावर खोचक टोले लगावले. ‘जिद्द हवी. बदल सगळीकडे घडू शकतो हे इथे दिसून आले. मी मनातल्या मनात विचार करत होतो, राजकारणात देखील एक इन्क्युबेशन सेंटर आवश्यक असते. आम्हीही उघडलं होतं २५-३० वर्ष. इन्क्युबेशनला मराठीत उबवणी केंद्र म्हणतात. आम्हीही नको ती अंडी उबवली. त्याचं पुढे काय झालं ते तुम्ही आता बघत आहातच. अशा गोष्टी घडत असतात. आपलं काम आपण केलं. पुढे काय करायचं हे त्यांनी ठरवायचं असतं, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

यावर माजी खासदार आणि भाजपचे नेते निलेश राणे यांनी आता मुख्यमंत्र्यांच्या या टीकेचा समाचार घेतला आहे. ‘मुख्यमंत्री काय बोलतात हे कळत नाही. त्यांचे बोलणे समजण्यासाठी ट्रान्सलेटर लागतो. २५ वर्षे स्वर्गीय बाळासाहेबांनी सेना-भाजप युती जपली, उद्धव ठाकरे यांनी नाही. सेनेचे भाजपवर आणि भाजपचे सेनेवर प्रेम होते. यात उद्धव ठाकरे कुठेच नव्हते. त्यामुळे त्यांना युतीवर भाष्य करण्याचा अधिकार काय? असा सवाल निलेश राणेंनी केलाय.

पुढे ते म्हणाले की, १९९५ पर्यंत उद्धव ठाकरे यांच्या हातात कॅमेराच होता, ते जंगलात फिरत होते. भाजपशी उद्धव ठाकरे यांचा काय संबंध. तुटलं काय किंवा जुळलं काय. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसारखं बोललं पाहिजे. तुम्ही यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ट्रेनिंग घ्या. कारण तुम्ही नारायण राणेंकडून ट्रेनिंग घेणार नाहीत. त्यानंतर बोलायला शिका आणि मग कुणी २५ वर्षे अंडी उबवली त्यावर भाष्य करा. २०२४ मध्ये राज्यातील नागरिकांनी तुम्हाला अंडी उबवण्यासाठी ठेवलंय हे समजले असा टोला राणेंनी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!