मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बारामती येथे अटल इनक्युबेशन सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी २५ वर्ष मित्रपक्ष असलेल्या आणि आता विरोधात बसलेल्या भाजपावर खोचक टोले लगावले. ‘जिद्द हवी. बदल सगळीकडे घडू शकतो हे इथे दिसून आले. मी मनातल्या मनात विचार करत होतो, राजकारणात देखील एक इन्क्युबेशन सेंटर आवश्यक असते. आम्हीही उघडलं होतं २५-३० वर्ष. इन्क्युबेशनला मराठीत उबवणी केंद्र म्हणतात. आम्हीही नको ती अंडी उबवली. त्याचं पुढे काय झालं ते तुम्ही आता बघत आहातच. अशा गोष्टी घडत असतात. आपलं काम आपण केलं. पुढे काय करायचं हे त्यांनी ठरवायचं असतं, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘अखेर मुख्यमंत्री ठाकरेंनी मान्य केले की ते घरकोंबडे आहेत’ अशी कोपरखळी भातखळकर यांनी मारली आहे.
आम्हीही अंडी
उबवली होती- मुख्यमंत्री…. अखेर मान्य केले
की ते घरकोंबडे आहेत— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 2, 2021
दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर ड्रग्ज माफियांशी संबंध असल्याचा अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी खळबळजनक आरोप केल्यानंतर आता मलिक विरुद्ध भाजप असा सामना सुरू झाला आहे. मलिक यांच्या या आरोपानंतर आता भाजपचे नेते मलिकांवर निशाणा साधू लागले आहेत. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही मलिकांवर टीका करताना त्यांना वेड्यांच्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला आहे.
भातखळकर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, नबाब मलिक रोज डोक्यात वारा शिरल्यासारखं बरळतायत. हाती पुरावे असतील तर कोर्टात जा की?, नाही तर वर्गणी काढून यांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये तरी दाखल करा. इतकेच नाही, तर नवाब मलिक हा जावयामुळे वेडा झालेला जगातला पहिला सासरा असल्याची खोचक टीकाही भातखळकर यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अजित पवारांशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा त्यासंदर्भातील नोटीसही नाही’
- ३० नोव्हेंबरपर्यंत राज्यात किमान पहिल्या डोसमध्ये १०० टक्के लसीकरण करा- मुख्यमंत्री ठाकरे
- देगलूरचा विजय म्हणजे जनतेचा आघाडीवरील विश्वास- नाना पटोले
- पराभवानंतर सुभाष साबने यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…
- एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी परिवहनमंत्र्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा – दिलीप धोत्रे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

