🕒 1 min read
बारामती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अटल इनक्युबेशन सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. याप्रसंगी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राज्यातील प्रमुख उद्योजकांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली. राजकारणात एकमेकांचे पटत नाही म्हणून अडथळे आणणे ही आपली संस्कृती असू शकत नाही. विकासकामाला पाठिंबा देता येत नसला तरी त्यात विघ्ने आणता कामा नये. आपल्याकडे विघ्नसंतोषी खूप आहेत. पण त्या विघ्नसंतोषींना नेमकं मिळतं काय, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.
राजकारणातदेखील इन्क्युबेशन सेंटर आम्ही पंचवीस-तीस वर्षांपूर्वी उघडले होते. इन्क्युबेशन सेंटर म्हणजे उबवणी केंद्र. पण दुर्दैवाने काय उबवले हे आपण पाहतो आहोत. आम्हीही नको ती अंडी उबवली, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. या वेळी केलेल्या छोटेखानी भाषणात मुख्यमंत्र्यांनी भाजपला चिमटे काढले. मंत्री नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आराेप केल्यानंतर प्रत्युत्तरात फडणवीस यांनी दिवाळीनंतर आपण बाॅम्ब फाेडू असे वक्तव्य सोमवारी केले होते. त्याचा समाचारही ठाकरेंनी घेतला. बाॅम्ब फाेडा पण धूर काढू नका, अजून काेराेना संपुष्टात आलेला नाही, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांना दिला.
आम्हीही नको ती अंडी उबवली
यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी २५ वर्ष मित्रपक्ष असलेल्या आणि आता विरोधात बसलेल्या भाजपावर खोचक टोले लगावले. ‘जिद्द हवी. बदल सगळीकडे घडू शकतो हे इथे दिसून आले. मी मनातल्या मनात विचार करत होतो, राजकारणात देखील एक इन्क्युबेशन सेंटर आवश्यक असते. आम्हीही उघडलं होतं २५-३० वर्ष. इन्क्युबेशनला मराठीत उबवणी केंद्र म्हणतात. आम्हीही नको ती अंडी उबवली. त्याचं पुढे काय झालं ते तुम्ही आता बघत आहातच. अशा गोष्टी घडत असतात. आपलं काम आपण केलं. पुढे काय करायचं हे त्यांनी ठरवायचं असतं, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
शरद पवारांचे कौतूक
उद्ध ठाकरेंनी इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन करताना शरद पवार आणि अजित पवार यांच्यासोबत पवार कुटुंबाचं कौतुक केलं. पवार साहेबांसारखा तरणाबांड नेता, सुप्रिया तू खोटं सांगितलं असेल सहस्त्रचंद्रदर्शन. ज्यांनी विकासाचा सूर्य दाखवला आणि अजूनही थांबायला तयार नाहीत. पवार साहेब महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहेत. संस्थांचे करतात. सगळे पवार कुटुंबीय अत्यंत मनापासून त्यासाठी काम करतायत. पवार कुटुंब विकासाच्या ध्यासात रमले आहे. विकास, विकास आणि विकासाच्या पुढे विकास, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘अजित पवारांशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा त्यासंदर्भातील नोटीसही नाही’
- ३० नोव्हेंबरपर्यंत राज्यात किमान पहिल्या डोसमध्ये १०० टक्के लसीकरण करा- मुख्यमंत्री ठाकरे
- देगलूरचा विजय म्हणजे जनतेचा आघाडीवरील विश्वास- नाना पटोले
- पराभवानंतर सुभाष साबने यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…
- एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी परिवहनमंत्र्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा – दिलीप धोत्रे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
