मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पत्रकार परिषद घेत असून नव्मावीं खुलासे करत आहेत. याच पार्श्वभूमीवर मलिक यांनी आज अजून एक सूचक ट्वीट केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे.
मलिकांनी आज एक ट्विट केले असून त्यामध्ये सुरुवातीला त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानंतर पुढे त्यांनी अजून एका गौप्यस्फोटाचा इशारा दिला आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत की,’शुभ दीपावली. तुम्हा सर्वांची दिवाळी मंगलमय होवो. हॉटेल ललितमध्ये अनेक रहस्य लपलेली आहेत. तेव्हा भेटूया रविवारी.’
शुभ दीपावली
आप सभी की दिवाली मंगलमय होहोटल 'The Lalit' मे छुपे है कई राज़…
मिलते है रविवार को— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 3, 2021
दरम्यान, त्यांच्या या ट्वीटमुळे नवीन चर्चांना सुरुवात झाली असून रविवारी कोणता नवा खुलासा नवाब मलिक करणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. तसेच यापूर्वी मलिक यांनी अजून एक ट्वीट केलं आहे. या ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी, लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे.’
महत्वाच्या बातम्या
- ‘अजित पवारांशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा त्यासंदर्भातील नोटीसही नाही’
- ३० नोव्हेंबरपर्यंत राज्यात किमान पहिल्या डोसमध्ये १०० टक्के लसीकरण करा- मुख्यमंत्री ठाकरे
- देगलूरचा विजय म्हणजे जनतेचा आघाडीवरील विश्वास- नाना पटोले
- पराभवानंतर सुभाष साबने यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…
- एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी परिवहनमंत्र्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा – दिलीप धोत्रे

