Share

राज ‘का’ कारण! सहानुभूतीची लाट आणि एकजुटीमुळेच देगलूरमध्ये काँग्रेसचा विजय

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर मतमोजणी मंगळवारी पार पडली. या निवडणुकीत ६३.९५ टक्के इतके मतदान झालं होते. या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. त्यांच्या विजयामागे चार कारणे महत्त्वाचे ठरल्याचे समोर येत आहे. यात प्रामुख्याने महाविकास आघाडीचा नियोजनबद्ध प्रचार, सहानुभूतीची लाट अन् निवडणुकीच्या तोंडावर माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने ही निवडणूक काँग्रेसला सोपी झाली.

काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर देगलूरमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत एकूण १२ उमेदवार रिंगणात होते. मात्र, तीन पक्षात प्रामुख्याने ही लढत झाली. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कारण संपूर्ण महिनाभर मंत्री अशोक चव्हाण देगलूर बिलोलीमध्ये तळ ठोकून होते. तर भाजपनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजपचे अनेक नेते आमदार पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण देगलूरमध्ये जीवाचं रान करुन प्रचार केला होता.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे गतवेळेच्या ६१ टक्के मतदानाच्या तुलनेत यंदा ६३.९५ टक्के मतदान झाले. वाढीव ३ टक्के मतदान काँग्रेसच्या पारड्यात पडल्याने मताधिक्य प्रचंड वाढले. तर पक्षप्रवेशापूर्वीच शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर करण्याची घाई केली. शिवसेनेतून बंडखोरी केलेले साबणे यांना भाजपने उमेदवारी दिल्यामुळे स्थानिक भाजप कार्यकर्ते नाराज होते. त्यानंतर भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली. जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये स्वगृही परतले.

महाविकास आघाडी एकजुटीने निवडणुकीला सामोरे गेली. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे दिग्गज नेते, मंत्री यांनी झंझावाती प्रचार करत सरकारच्या योजना व जमेच्या बाजू मतदारांपर्यंत पोहोचवल्या. तसेच काँग्रेसचे दिवगंत नेते रावसाहेब अंतापूरकर यांचा मतदारसंघात उत्तम कनेक्ट होता. त्यांचे निधन झाल्यानंतर काँग्रेसने त्यांचे पुत्र जितेश यांना उमेदवारी दिली. रावसाहेब अंतापूरकर यांना मानणारे मतदार पूर्णपूणे जितेश यांच्या पाठीशी राहिल्याचे निकालावरून पाहायला मिळतेय.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!