Share

अजित पवार बनवाबनवी आणि फसवाफसवी थांबवा- किरीट सोमय्या

Published On: 

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित १ हजार कोटीच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्याचा दावा केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा अजित पवारांवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात सोमय्या यांनी ट्विट केले असून त्यामध्ये ते म्हंटले आहेत की,’अजित पवार लोकांना मूर्ख बनवणे थांबवा. तुमच्या कौटुंबिक मित्र कंपन्यांचे हजारो कोटीहून अधिक बेनामी आणि नामी साम्राज्या ८ पेक्षा अधिक शहरांमध्ये पसरलं आहे. स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेड या होल्डिंग/मेन कंपनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासोबत स्थापन केली होती. त्यासाठी १३ वर्षांपूर्वी १०० कोटी रुपये मिळाले होते, ते परत आले की नाही? बनवा बनवी आणि फसवा फसवी थांबवा.’

दरम्यान, अजित पवार यांच्याशी संबधित मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. परंतु यात कोणतेही तथ्य नसल्याचे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!