धुळे : पंतप्रधान हे सर्वोच्च व सन्मानाचे पद आहे. पण नरेंद्र मोदी यांनी या पदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवली आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीये. शिरपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत नाना पटोले बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्रातील भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला लोकशाही मान्य नाही. त्यांचा कारभार ठोकशाही पद्धतीने चालतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले, या संविधानाचे रक्षण करण्याचे काम काँग्रेसने केले म्हणून एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला. परंतु सत्तेत आल्यापासून मोदींनी सर्व व्यवस्थाच मोडीत काढली, असं म्हणत नाना पटोले यांनी मोदींवर निशाणा साधला.
मोदी सरकारने कोरोना संकटात देशातील जनतेला वाऱ्यावर सोडून दिले. लोक तडफडून मरत असताना मोदी पश्चिम बंगालमध्ये प्रचारात व्यस्त होते. लसीकरण मोहिमेच्या अपयशाने मोदींचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे. देशातील जनतेला लसींची गरज असताना मोदींनी पाकिस्तान सारख्या शत्रू राष्ट्राला मोफत लस दिली आणि देशातील लोकांना मात्र लस विकत घेण्यासाठी भाग पाडले जात आहे. लसीकरण मोहिम फसली आहे परंतु प्रसिद्धीचा हव्यास लागलेल्या मोदींनी लसीकरणाचे श्रेय घेण्यासाठी कॉलेजमध्ये मोदींना धन्यवाद देणारे पोस्टर्स व होर्डींग्स लावण्याचे फर्मान काढले आहे. लोकशाही मध्ये फर्मान कसे काय काढले जाऊ शकते?’, असा सवाल पटोले यांनी केलाय.
देशातील जनतेला लसींची गरज असताना मोदींनी पाकिस्तान सारख्या शत्रू राष्ट्राला मोफत लस दिली आणि देशातील लोकांना मात्र लस विकत घेण्यासाठी भाग पाडले जात आहे. लसीकरण मोहिम फसली आहे परंतु प्रसिद्धीचा हव्यास लागलेल्या मोदींनी लसीकरणाचे श्रेय घेण्यासाठी कॉलेजमध्ये मोदींना धन्यवाद देणारे पोस्टर्स व होर्डींग्स लावण्याचे फर्मान काढलं आहे. लोकशाही मध्ये फर्मान कसं काय काढलं जाऊ शकतं?, असे ते म्हणाले.
त्याचबरोबर मोदी सरकार हे सामान्य लोकांचे, शेतकरी, कष्टकरी लोकांचे सरकार नाही. जनता महागाईत होरपळत आहे. शेजारच्या श्रीलंका, भूतान, नेपाळमध्ये पेट्रोल 60-65 रुपये लिटर आहे. आपल्याला मात्र त्यासाठी 100 रुपये मोजावे लागत आहेत. भरमसाठ कराच्या रुपाने मोदी सरकार जनतेच्या खिशावर दरोडा टाकत असल्याचा गंभीर आरोप पटोले यांनी केलाय.
महत्वाच्या बातम्या
- कबीर बेदींनी मुलाच्या आत्महत्यानंतर व्यक्त केलं दुःख
- ‘जर झेपत नसेल तर राजीनामा द्या’, सुप्रिया सुळेंनी महापौरांना सुनावले
- इतर पक्षातील नेते आपल्या पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा सर्वपक्षीय नेते का करत आहेत ?
- #HBD : मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री ‘सई ताम्हणकरला’ वाढदिवसाच्या शुभेच्छा…
- गुगलवर ‘हे’ सर्च करत असाल तर होऊ शकते तुमचीही फसवणूक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

