Share

‘ख्रिस गेल’ने दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!, पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल म्हणाला…

Published On: 

🕒 1 min read

भारत आज (बुधवार) ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. यावेळी अनेक सेलिब्रिटींनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू आणि ‘युनिव्हर्स बॉस’; आपल्या नावाने प्रसिद्ध असलेल्या ख्रिस गेलनेही भारताला ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आयपीएलमध्ये अनेक संघाकडून खेळलेल्या ख्रिस गेलचे भारतात अनेक चाहते आहेत.

ख्रिस गेलने ट्विटद्वारे प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्याने सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांला या प्रसंगी वैयक्तिक संदेश पाठवला आणि भारत आणि त्यांच्यातील संबंध किती खोल आहेत याचा उल्लेख केला. गेलने लिहिले, “मी भारताला ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक संदेशाने जाग आली, ज्यात त्यांच्या आणि भारतातील लोकांशी असलेल्या माझ्या जवळच्या संबंधांचा उल्लेख केला. युनिव्हर्स बॉस कडून तुम्हा सर्वांचे अभिनंदन आणि प्रेम.”

ख्रिस गेलने आपल्या क्रिकेट करिअरच्या शेवटच्या काळात भारतात आयपीएलमध्ये चांगलीच रंगत निर्माण केली. २०११ च्या विश्वचषकापासून गेलने इंडियन प्रीमियर लीगमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. यासोबतच गेलने वेस्ट इंडिजसाठी अनेकवेळा महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.

लांब षटकार मारण्यासाठी ओळखला जाणारा ख्रिस गेल वेस्ट इंडिजच्या टी -२० विश्वचषक वेजेत्या संघाचा दोन वेळा सदस्य राहिला आहे. गेलने २०१२ आणि २०१६ मध्ये वेस्ट इंडिजसोबत टी-२० विश्वचषक जिंकला होता. वेस्ट इंडिजसाठी ४८३ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या गेलची गणना वेस्ट इंडिजच्या महान खेळाडूंमध्ये केली जाते. त्याच्या नावावर १९५९३ आंतरराष्ट्रीय धावा आणि ४२ आंतरराष्ट्रीय शतके आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!