🕒 1 min read
नवी दिल्ली : कोरोना लस कोविशील्ड बनवणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचे एमडी सायरस पूनावाला यांना सरकारने २०२२ साठी पद्मभूषण देण्याचा निर्णय घेतला आहे. सायरस पूनावाला हे भारताचे लस राजा मानले जातात. ते पूनावाला ग्रुपचे अध्यक्ष आहेत, ज्यामध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचाही समावेश आहे. सीरम इन्स्टिट्यूटने भारतात कोविशील्ड लस तयार केली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सायरस पूनावाला यांचे अभिनंदन केले आहे.
शरद पवार म्हणाले, “वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल माझा बॅचमेट सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल मला अभिमान आहे.”
So proud of my batchmate Cyrus Poonawala for being awarded Padma Bhushan for the outstanding contribution in the field of medicine.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 25, 2022
सायरस पूनावाला यांच्याशिवाय मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनाही पद्मभूषण प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे तिघे देशाचे सेलिब्रेटी आहेत, ज्यांनी केवळ भारतातच नाही तर जगभरात देशाचा गौरव केला आहे.
मंगळवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये देशातील १२८ सेलिब्रिटींना पद्म पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये देशातील पहिले सीडीएस बिपिन रावत आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांची सर्वात मोठी नावे आहेत, ज्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “अक्कलशून्य सरकारने संपूर्ण लोकशाहीच पायदळी तुडविली”; सोमय्यांना नोटीस पाठवल्यामुळे फडणवीस संतापले
- “माफियाराजवर बोलत असाल तर…”; धनंजय मुंडेंचे पंकजांना आव्हान
- कॅप्टन विराट होता, पण सगळे धोनीचं ऐकायचे दिनेश कार्तिकनं केला गौप्यस्फोट!
- आफ्रिका विरुद्ध एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर के एल राहुलची भावनिक पोस्ट
- अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटा अगोदर श्रेयसने दिला होता हॉलिवूडच्या ‘या’ पात्रासाठी आवाज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
