Share

कॅप्टन विराट होता, पण सगळे धोनीचं ऐकायचे दिनेश कार्तिकनं केला गौप्यस्फोट!

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : महेंद्र सिंग धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघाचे सगळे सूत्र हललेले दिसले. याचा मोठा परिणाम खेळाडूंवरही दिसून आला आहे. माहीच्या नेतृत्वात अप्रतिम कामगिरी करणारे काही खेळाडू अचानक खराब फॉर्ममध्ये गेले. यात सर्वात मोठी चर्चा कुलचा म्हणजेच कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांची होते. माहीच्या निवृत्तीनंतर अचानक या दोन्ही मुख्य फिरकी गोलंदाजांची कामगिरी ढासळी. त्यांच्या ढासळलेल्या कामगिरीचा माहीच्या नेतृत्वाशी संबध असल्याचा मोठा खुलासा दिनेश कार्तिकने केला आहे.

एका वृत्तवाहिनीला बोलताना त्याने याबाबत वक्तव्य केले आहे. मला पूर्ण विश्वास आहे कि माहीच यांच्या होणाऱ्या खराब कामगिरीचा कारण आहे. तो विकेटमागे नसल्याचा दोघांवर परिणाम झाला आहे. मी धोनीला या दोघांना खुपदा मदत करताना पाहिलंय. जर फलंदाज लांब हिट मारत असेल तेव्हाही धोनी त्यांना सल्ले द्यायचे ज्यावर ते दोघेही डोळे बंद करून विश्वास ठेवत असत. दोघेही जास्त काळ विराटच्या नेतृत्वात खेळले , मात्र ते धोनीचे जास्त ऐकायचे

कार्तिकने केलेल्या या खुलास्याने अनेकांना त्यांचे उत्तर मिळाले आहे. कुलदीप आणि चहल संघातील मुख्य फिरकी गोलंदाज असल्यामुळे त्यांची कामगिरी संघासाठी महत्वाची ठरते. मात्र आता धोनी आणि कोहली दोन्ही कर्णधार नाहीत. त्यामुळे रोहितच्या कर्णधारपदात संधी मिळाली तर कुलचा (कुलदीप आणि चहर ) पुन्हा चांगली कामगिरी करतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!