🕒 1 min read
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर सतत आरोप करत असणारे भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) सध्या एका फोटोमुळे अडचणीत आले आहेत. किरीट सोमय्या काही दिवसांपूर्वी मंत्रालयातील नगरविकास खात्याच्या कार्यालयात गेले होते. तेव्हा किरीट सोमय्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईली तपासत होते. तर नगरविकास खात्यातील अधिकारी किरीट सोमय्या यांच्यासमोर उभे होते, हा फोटो व्हायरल झाल्यानंतर किरीट सोमय्या यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
दरम्यान, किरीट सोमय्या यांना नोटीस पाठवल्यामुळे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. “महाविकास आघाडी सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का? माहिती अधिकारात फाईलचे निरीक्षण करण्यासाठी गेले तर त्यासाठी थेट माहिती मागणाऱ्यालाच नोटीस देण्यात आली. या अक्कलशून्य सरकारने संपूर्ण लोकशाहीच पायदळी तुडविली आहे. किरीट सोमय्यांना नोटीस कसली देता, ही नोटीस द्यायला सांगणाऱ्या बोलवित्या धन्यावर कारवाई करा!”, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
सरकारचे डोके नेहमी उलटेच चालते
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मंत्रालयातील प्रत्येक विभागात सीसीटीव्ही आहेत. हे फोटो कुणी काढले हे जरी शोधले तरी ते प्रसारित कुणी केले, हे सहज स्पष्ट होईल. पण, महाविकास सरकारचे डोके नेहमी उलटेच चालते. सरकारी कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा नोटीसा दिल्या. हाच का तुमचा पारदर्शी कारभार?”
केवळ हुकूम सोडून कारवाई कसली करता?
“शासनाच्या कार्यालयात जाऊन माहिती अधिकारात माहिती मागणे, फाईलचे निरीक्षण करणे, हा अधिकार सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दीर्घ लढ्यानंतर सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिला. एखादी प्रक्रिया माहिती नसेल तर ती जाणून घ्या. केवळ हुकूम सोडून कारवाई कसली करता?”, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- कॅप्टन विराट होता, पण सगळे धोनीचं ऐकायचे दिनेश कार्तिकनं केला गौप्यस्फोट!
- आफ्रिका विरुद्ध एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर के एल राहुलची भावनिक पोस्ट
- अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटा अगोदर श्रेयसने दिला होता हॉलिवूडच्या ‘या’ पात्रासाठी आवाज
- बाजरीची भाकरी अन् हिरव्या मिरचीचा ठेचा; भाजपकडून औरंगाबादेत अनोख्या ‘डबा पार्टी’चे आयोजन..!
- औरंगाबादेत राष्ट्रवादीला हवी काँग्रेसची साथ; युतीसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना साकडे..!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
