🕒 1 min read
बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यात नेहमीच वाद-विवाद होत असतात. आता पुन्हा एकदा दोघांमध्ये वाद सुरू झाला आहे. “बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असून माफियाराज सुरू झाला आहे. सामान्य लोकांचे हित धाब्यावर बसून स्वतःचे खिसे भरण्याच काम सुरू आहे, असे गंभीर आरोप करत पंकजा मुंडे यांनी पालकमंत्री धनंजय मुडेंवर (dhananjay munde) निशाणा साधला होता. यावर धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“पंकजा मुंडे यांना बोलताना भान राहत नाही. बीड जिल्ह्याची बदनामी त्या स्वतः करतात. किमान ज्या ठिकाणी जन्माला आलो तिथला अभिमान असला पाहिजे. इतर कोणताही मुद्दा मिळाला नाही, की काहीतरी बोलायचं. कुठंतरी विरोधाला विरोध करायचा. कुठला मुद्दा मिळत नसला की बीडच्या माफियाराजवर बोलायचं. तुम्ही बीडच्या माफियाराजवर बोलत असाल तर नाव घेऊन बोला, बीडचं नाव कशाला खराब करताय?”, असा सवाल धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना केला आहे.
काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?
बीड जिल्ह्यातील केज पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या, “आम्ही दोन वर्ष शांत बसलो होतो. राजकारण नको म्हणून कुणावर टीका टिप्पणी केली नाही. मात्र आज बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या माफियाराज आणि सामान्य लोकांची लूट पाहावत नाही. म्हणून रस्त्यावर उतरून न्याय मागणार आहे.”
महत्वाच्या बातम्या :
- कॅप्टन विराट होता, पण सगळे धोनीचं ऐकायचे दिनेश कार्तिकनं केला गौप्यस्फोट!
- आफ्रिका विरुद्ध एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर के एल राहुलची भावनिक पोस्ट
- अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटा अगोदर श्रेयसने दिला होता हॉलिवूडच्या ‘या’ पात्रासाठी आवाज
- बाजरीची भाकरी अन् हिरव्या मिरचीचा ठेचा; भाजपकडून औरंगाबादेत अनोख्या ‘डबा पार्टी’चे आयोजन..!
- औरंगाबादेत राष्ट्रवादीला हवी काँग्रेसची साथ; युतीसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना साकडे..!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
