मुंबई – कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीने पूरस्थिती निर्माण झाली आहे.सातारा आणि रायगड मधील महाड मध्ये दरड कोसळून मोठी मनुष्यहानी झाल्याची दुःखद दुर्घटना घडली आहे. या नैसर्गिक संकटात केंद्र सरकार आणि एनडीआरएफ टीम पूरग्रस्तांना मदतीचा हात देत आहे. या अपत्तीग्रस्तांना केंद्र मदत करीत आहे मात्र राज्य सरकारने ही बचावकार्याचा वेग वाढवून भरीव मदत करावी असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
अतिवृष्टीने दरड कोसळून चेंबूर आणि विक्रोळी येथे नुकतीच दुर्घटना घडली. त्यात अनेक जण मृत्यूमुखी पडले. मुंबईत अतिवृष्टीने दरड कोसळण्याच्या अनेकदा दुर्घटना घडून शेकडो निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत.त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी मुंबई ठाणे आदी महानगर क्षेत्रातील डोंगराळ धोकादायक ठिकाणी वसलेल्या झोपडीवासीयांचे सुरक्षितस्थळी कायमचे पुनर्वसन करावे यासाठी मुख्यमंत्र्यांना आपण पत्र लिहिणार आहोत. डोंगराळ भागात प्रलंबित झोपडपट्टी पुनर्वसन योजना लवकर पूर्ण करण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा अशी सूचना आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करणार असल्याचे प्रतिपादन आठवले यांनी केले.
चेंबूर च्या भारत नगर येथील भिंत कोसळून 20 जणांचा मृत्यू झाला.त्यांच्या कुटुंबियांची रामदास आठवले यांनी आज भारत नगर येथे सांत्वनपर भेट घेतली. यावेळी दरड कोसळून मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे 5 लाखांच्या मदतीचा धनादेश आज देण्यात आला. तसेच केंद्र सरकार तर्फे 2 लाखांचा निधी लवकर देण्यात येईल त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे रामदास आठवले म्हणाले.
शासनाच्या 5 लाख रुपयांच्या नीधीने दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांचे प्राण पुन्हा येणार नाही त्यामुळे अशा दुर्घटनेत कुणाचा मृत्यू होऊ नये; अशा दुर्घटनाच होऊ नयेत यासाठी डोंगराळ भागातील धोकादायक ठिकाणच्या झोपड्यांचे कायमस्वरूपी सुरक्षितस्थळी पुनर्वसन करावे या मागणीकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यायला हवे. तसेच दुर्घटनेत घरे गमावलेल्या झोपडीवासीयांना शाळांमध्ये तात्पुरते स्थलांतरित केले आहे. तेथे कोणतीही सुविधा नसल्यामुळे या दुर्घटनाग्रस्त झोपडीवासीयांचे मुंबई मनपा; एसआरए ; एमएमआरडीए या प्राधिकरणाचा समन्वय साधून तात्पुरत्या घरांमध्ये स्थलांतरित करावे अशी सूचना ना रामदास आठवले यांनी केली. चेंबूर आणि विक्रोळी सुर्यनगर येथे भेट दिल्यानंतर आठवले यांनी शिवाजीनगर गोवंडी येथे दुमजली घर कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात सतत जोरदार पाऊस होत असल्याने राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.कोकणात चिपळूण महाड तर पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्हयात अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. त्यांना केंद्र सरकार तर्फे भरीव मदत मिळवून देऊ असे सांगत राज्य सरकार ने पूरग्रस्तांना आर्थिक मदत त्वरीत दिली पाहिजे अशी मागणी रामदास आठवले यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- केरोसीन आणि अन्नधान्य पूरग्रस्त भागात पोहोचवणार; छगन भुजबळ यांची माहिती
- ‘संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे अनिल परब हे पळकुटे मंत्री’
- दोन मुलांचे धोरण देशभरात राबवणार का?, केंद्राने संसदेत दिले ‘हे’ उत्तर
- ‘डोक्यावर मृत्यू दिसत असूनही नागरिकांना मरणासाठी का सोडले?, भाजपाचा संतप्त सवाल
- ‘राज्यावरील संकटात मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा अर्थ म्हणजे ‘मला जमत नाही!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

