Share

‘कौरव आणि भाजप नेत्यांची भाषा एकच.. शेवट आपल्याला माहितीच आहे’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक दौऱ्यांतर्गत युवावर्गाला जोडण्याच्या मोहिमेसाठी चंद्रशेखर बावनकुळे हे जळगाव येथे आले होते. त्यांनी भाजपच्या ‘वसंतस्मृती’ या जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बावनकुळे त्यांनी एकनाथ खडसे यांच्याबद्दल भाष्य केले होते.

‘खडसेच काय कुणीही सोडून गेले तरी भाजपला फरक पडणार नाही. भाजप हा कार्यकर्त्यावर चालणार पक्ष आहे, नेत्यांवर नाही’ असे म्हणत बावनकुळे यांनी पक्ष सोडण्याचा इशारा देणऱ्यांचा समाचार घेतला.

दरम्यान, बावनकुळे यांच्या या वक्तव्याचा आधार घेत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपावर टीका केली आहे. कौरव देखील आम्हाला कोणाची गरज नाही असे म्हणायचे, पण शेवटी काय झाले हे सर्वांना माहितीच आहे असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.

मिटकरी यांनी ट्विट केले की, ‘कौरव पण असेच म्हणायचे, ‘हमे कोई छोडकर गया तो हस्तीनापूर पर फरक नहीं पडता..’ शेवट आपल्याला माहिती आहे. भाजपला अहंकार नडणार.. भाजपाचे एक पाऊल कुरुक्षेत्राकडे’.

काय म्हणाले होते चंद्रशेखर बावनकुळे?
भाजप हा ओबीसी आणि बहुजनांचा सन्मान करणारा पक्ष आहे. फडणवीस सरकारमध्ये ६० टक्के मंत्री हे ओबीसी होते. आज महाविकास आघाडी सरकार आणि फडणवीस सरकारची तुलना करा. फरक सर्वांच्या लक्षात येईल. एकनाथ खडसे यांनाही पक्षाने खूप काही दिले. मी स्वतः तसेच पंकजा मुंडे यांनाही पक्षाने भरपूर संधी दिली. त्यामुळे पक्षाने अन्याय केला हे खडसेंचे म्हणणे चुकीचे आहे. त्यांच्याबाबतीत एखादा विषय झाला असेल, काही घटना घडली असेल तर लगेचच पक्ष चुकीचा ठरत नाही. एकनाथ खडसे हे पक्ष सोडून गेल्याने पक्षाचे काही एक नुकसान झालेले नाही. खडसेच काय तर कुणीही सोडून गेले तरी भाजपला फरक पडणार नाही असे बावनकुळे जळगाव येथे म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!