Share

मिलरच्या नाबाद खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेची आर्यलँडवर ४२ धावांनी मात

Published On: 

मुंबई : आर्यलँडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ४२ धावांनी विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या १६० धावांचा पाठलाग करताना आर्यलँडचा संपुर्ण संघ ११७ धावांवर बाद झाला. यासह दक्षिण आफ्रिकेने टी-२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निर्धारीत २० षटकात दक्षिण आफ्रिकेने ७ गडी गमावत १५९ धावांची मजल मारली. मधली फळी अपयशी ठरल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड मिलरने ४४ चेंडुत ४ चौकार आणि ५ षटकारांसह सर्वाधीक नाबाद ७५ धावांची अर्धशतकी खेळी केली. मार्क अदैर आणि पाउल स्टर्लींगने आर्यलँडकडून सर्वाधीक २-२ गडी बाद केले.

प्रत्युत्तरात आर्यलँडचा संपुर्ण संघ ११७ वर बाद झाला. शेन गेटकेटेनने आर्यलँडकडून १८ चेंडुत १ चौकार आणि २ षटकारांसह सर्वाधीक २४ धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त आर्यलँडचे इतर फलंदाज अपयशी ठरल्यामुळे केवळ ११७ धावांपर्यंत मजल मारता आली. दक्षिण आफ्रिकेकडून बोर्न फॉर्चुईन आणि तबरेज शम्सी या दोघांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!