Share

केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची शनिवारी वैजापूर-गंगापूरात जन आशीर्वाद यात्रा!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा वैजापूर-गंगापूर विधानसभा मतदारसंघात जन आशीर्वाद दौरा शनिवारी (दि.२८) आयोजित करण्यात आला आहे. जनतेच्या आशीर्वादाने मंत्रीपद मिळाले म्हणून भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात जे नवीन मंत्री नियुक्त झाले आहेत त्यांनी आपापल्या भागात जाऊन जनतेचे आभार मानून त्यांचा आशीर्वाद घ्यावा अशी संकल्पना पक्षातील वरिष्ठांनी मांडली होती. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाने खासदार भागवत कराड यांच्या जन आशिर्वाद यात्रेला मराठवाड्यातील बीड येथून सुरुवात झाली.

केंद्रात मंत्री पद मिळाल्यानंतर डॉ. भागवत कराड यांनी मराठवाड्याचा दौरा करत ‘जनआर्शिवाद’ यात्रा काढली आहे. बीड मधून सुरू झालेली यात्रा जालना, बदनापूर, सिल्लोड, औरंगाबाद याठिकाणी देखील आयोजित करण्यात आली होती. शनिवारी वैजापूर-गंगापूर मतदारसंघात जन आशीर्वाद यात्रेचा रथ पोहोचणार आहे. दोन्ही तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण असून यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली आहे. वैजापूर शहरात शिवसेनेचे राज्य असले तरी गंगापूर मतदारसंघात भाजपने आपला गड आमदार प्रशांत बंब यांच्या रुपाने राखला आहे.

यावेळी लासुरगांव देवी दाक्षायणी मातेचे दर्शन घेऊन मोटरसायकल रॅलीने सुरूवात होईल. तिडी मार्गे वैजापूर येथील हिंदू मुस्लिम धर्माचे आदर स्थान नौगाजी बाबा दर्गा दर्शनानंतर मार्केट कमिटीत कराड यांचा सत्कार करण्यात येणार आहे. महाराणा प्रताप, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून विविध ठिकाणी तुला, सत्कार, विविध संघटनाची भेट व कार्यालयाचे उद्घाटन आणि ठक्कर बाजार येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, तालुका अध्यक्ष कल्याण पा. दांगोटे यांनी जनआशीर्वाद दौऱ्यानिमित्त जनतेने उपस्थित राहून आशीर्वाद द्यावा असे आवाहन केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!