🕒 1 min read
मुंबई : राज्यातील आशा स्वयंसेविकांना देण्यात येणाऱ्या दरमहा मोबदल्यात एक हजार रुपये, तर गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात दरमहा १२०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करोना महासाथ सुरू असेपर्यंत आशा स्वयंसेविका व गटप्रवतकांना दरमहा पाचशे रुपये कोविड भत्ता राज्य शासनाच्या निधीतून देण्यासही मंजुरी देण्यात आली. ही वाढ जुलै २०२१ या महिन्यापासून देण्यात येईल. त्यासाठी होणाऱ्या अंदाजे १३५ कोटी ६० लाख रुपयांच्या वार्षिक तरतुदीस मान्यता देण्यात आली.
आशा स्वयंसेविकांना देण्यात येणाऱ्या दरमहा मोबदल्यात १ हजार रुपये तर गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात दरमहा १२०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच कोरोना महामारी सुरु असेपर्यन्त आशा स्वयंसेविका व गटप्रर्वतक यांना दरमहा ५०० रुपये कोविड भत्ता देण्यात येणार आहे. pic.twitter.com/4H4JGAGWN0
— Balasaheb Thorat (@bb_thorat) August 27, 2021
जून महिन्यात विविध मागण्यांसंदर्भात आशा स्वयंसेविकांनी संप पुकारला होता. आशा स्वयंसेविकेंकडून ७२ वेगवेगळ्या प्रकारची कामे करून घेतली जातात. त्या कामाच्या बदल्यात मात्र तुटपुंजे असे मानधन दिले जाते. कामाच्या मोबदल्यात जे मानधन दिले जाते ते न देता वेतन देण्यात यावे. आशा स्वयंसेविकांना कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात येऊन शासकीय सेवेत कायम कराव्या अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या होत्या. राज्य शासनाने आशा स्वयंसेविकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला असून त्याचा राज्यातील ६८ हजार २९७ आशा सेविका आणि ३ हजार ५७० गट प्रवर्तक यांना लाभ होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणूका घेऊ नका’, सर्वपक्षीय बैठकीत फडणवीसांची मागणी
- ‘ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यावर राज्यातील नेत्यांमध्ये एकमत’, सर्वपक्षीय बैठकीनंतर नाना पटोलेंची माहिती
- ‘आपल्याच वहिनीवर ऍसिड फेकायला कोणी सांगितलं हेही मला माहितेय’, राणेंनी ‘त्या’ प्रकरणाला दिला उजाळा
- ‘आज पण राणेंमुळे शिवसेनेत पद मिळतात’, नितेश राणेंचा टोला
- ‘जे बोललो ते सर्व शब्द मी पूर्ण करेन’, नारायण राणेंचा विश्वास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
