🕒 1 min read
सांगली : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरुन राज्यात राजकीय रणकंद सुरु आहे. राणेंच्या टीकेनंतर राज्यभर त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. सेना-भाजपच्या नेत्यांमध्ये टीकांचे धारदार बाण एकमेकांवर सोडले जात आहेत.
नारायण राणेंना पोलिसांनी अटक देखील केली होती. तर राणेंची अटक ही पोलिसांवर दबाव टाकून करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. याप्रकरणी सीबीआय चौकशी करावी अशी मागणी भाजपकडून करण्यात येत असून मंत्री अनिल परब यांच्याविरोधात तक्रार करण्याची तयारी देखील भाजपने सुरु केली आहे. याबाबत आता भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत बोलताना महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे.
‘हे सरकार पोलीस आणि गुंडांच्या जोरावर चाललंय. महाविकास आघाडीतील तीन पक्ष आता शेवटची तडफड करत आहेत. आम्ही तुटू फुटू असं त्यांना वाटतंय. पण आम्ही सुद्धा संयमाने एक एक बॉम्ब टाकतो आणि गायब होतो,’ असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.
पुढे त्यांनी ओबीसी आरक्षणावरून देखील सरकारला लक्ष्य केलं. ‘ओबीसी आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय भाजप एकही निवडणूक होऊ देणार नाही. नेहमी एकमेकांविरोधात भांडायचं आणि फुटायची वेळ आली की एकमेकांना घट्ट पकडून ठेवायचं. लोकांना उल्लू बनवण्याचं काम सुरु आहे,’ अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘दोन राऊत शिवसेनेला बुडवणार’; नारायण राणेंच भाकीत
- ‘थोबाड’ प्रकरणात राजकारणी व्यस्त, त्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही-बाबा आढाव
- जनताच कुंभकर्णासारखी झोपलीये, मी एकटाच कधीपर्यंत लढू? – अण्णा हजारे
- देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्या बंद दाराआड भेटीवर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
- ‘जे काही घडलं.. आता आमच्यासाठी हा विषय संपला आहे’, बदलत्या राजकीय वातावरणावर आदित्य ठाकरेंचे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
