औरंगाबाद : औरंगाबादेतील दीक्षा शिंदे या विद्यार्थीनीची नासाच्या फेलोशिप पॅनलवर निवड झाल्याचे वृत्त गेल्या काही दिवसात झळकले होते. मात्र आता या निवडीवरच वादंग उठले आहे. नासाने आम्ही औरंगाबाद येथील अशा कुठल्याही विद्यार्थिनींची निवड केलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर या विद्यार्थिनीद्वारे आपली निवड अधिकृत असल्याचे सांगितले जात असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांनीदेखील याबाबत ट्विट करत ही निवड फेक असल्याचे सूचित केले आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मे २०२१ मध्ये वुई लिव्ह इन ब्लॅकहोल ? म्हणजेच आपण कृष्ण विवरात राहतो ? या नावाचा एक संशोधन पेपर दीक्षाने सादर केला होता. व त्याआधारे अल्पसंख्याक सेवा संस्था (एमएसआय) फेलोशिपच्या व्हर्च्युअल पॅनलिस्ट म्हणून आपली नासाने नियुक्ती केल्याचा दावा तिने केला होता. त्यासाठी नासाकडून मानधन मिळत असल्याचेही सांगितले होते. त्यानंतर दीक्षाची मुलाखत प्रसिद्ध झाली. वृत्तपत्रे व वाहिन्या यांवर दीक्षाला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर औरंगाबादचे खासदार जलील यांनी २० ऑगस्ट रोजी आपल्या कार्यालयात बोलवत दीक्षाचा सत्कार केला होता.
Fact checkers are on to find out details of this reward. I'm told that this is fake. Although the girl and her family are equally in the dark regarding this.
The girl dreams of working for NASA. We'll try and get the best education for her to fulfill this dream.
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) August 20, 2021
मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही निवड फेक असू शकते. असे ट्विट केल्याने दीक्षाच्या निवडीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या ट्विटमध्ये जलील यांनी म्हटले आहे, ‘या बक्षीसाचा तपशील शोधण्यासाठी फॅक्ट चेकर सुरू आहेत. मला सांगण्यात आले की हे बनावट आहे. मुलगी आणि तिचे कुटुंबीय याबाबतीत अंधारात असले तरी. मुलगी नासासाठी काम करण्याचे स्वप्न पाहते. आम्ही हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्यासाठी सर्वोत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न करू’. एएनआय या वृत्तवाहिनीला नासाने दिलेल्या माहितीनुसार, ही निवड थर्ड पार्टीने दिलेल्या चुकीच्या माहितीच्या आधारावर करण्यात आल्याचे सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- कॉंग्रेसच्या कार्यकारणीत राजीव सातव यांची पत्नी प्रज्ञा यांना पक्षाने दिली मोठी संधी, भावूक होऊन म्हणाल्या…
- ‘विराट ‘या’ दिवशी करणार शतकी खेळी’; 19 वर्षीय भारतीय क्रिकेटपटूची भविष्यवाणी
- जनताच कुंभकर्णासारखी झोपलीये, मी एकटाच कधीपर्यंत लढू? – अण्णा हजारे
- औरंगाबाद काँग्रेसमधील गटा-तटाच्या राजकारणाचा ताळमेळ जमवण्यात नाना पटोले यशस्वी झाले का?
- ‘ओबीसी आरक्षणावर अजून निर्णय नाही, येत्या शुक्रवारी होणार बैठक’, पटोलेंची माहिती


