🕒 1 min read
ठाणे : कालच शिवसेनेचे ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ‘मीच स्वतः अडचणीत आहे त्यामुळे दुसऱ्यांच्या अडचणीबाबत मला काय विचारता’ असे खळबळजनक वक्तव्य केले होते. त्यानंतर आता पुन्हा ‘केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात माझाच बळी जातोय’ असे व्यक्त सरनाईक यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत.
एका पत्रकार परिषदेत यासंदर्भात बोलतांना सरनाईक म्हणाले की, ‘मी सुरवातीपासून सांगितलेले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणामध्ये काही लोकांचा बळी जोतो त्यातला मी एक आहे. मात्र मला ईडीच्या कुठल्याही अधिकाऱ्याकडून त्रास झाला नाही. ते त्यांचे काम करत आहेत.’ सरनाईक हे सध्या ईडीच्या कारवाईला सामोरे जात असल्याने या पार्श्वभूमिवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
टॉप्स ग्रुपकडून एमएमआरडीएला १७५ कोटींच्या कंत्राटासाठी ७ कोटींची लाच देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. टॉप्स सिक्युरिटीचे सेवानिवृत्त कर्मचारी रमेश अय्यर यांनी २८ ऑक्टो. ला तशी तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. राहुल नंदा यांच्या टॉप्स सिक्युरिटीकडून १०० पैकी फक्त ७० टक्के गार्ड्स वापरले जायचे. ३० टक्के गार्ड्सचा वापर केला जात नव्हता. जवळपास दीडशेच्या आसपास गार्ड्स वापरले जात नव्हते. मात्र त्यांची रक्कम सगळी टॉप्स ग्रुपला मिळत होती. त्यातील काही रक्कम अमित चांदोळे आणि संकेत मोरे यांना मिळत असल्याचीही माहिती तपासातून समोर आली. तसेच यापैकी काही रक्कम प्रताप सरनाईक यांना मिळत असल्याचा संशय ईडीला असल्यामुळे त्यांचा तपास सुरु आहे.
दरम्यान, याच प्रकरणी काही दिवसांमध्ये शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. तसेच यासंदर्भात भाजपाकडून प्रताप सरनाईक, अनिल परब आणि अनिल देशमुख यांच्याविरोधात जोरदार टीका करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘दोन राऊत शिवसेनेला बुडवणार’; नारायण राणेंच भाकीत
- ‘थोबाड’ प्रकरणात राजकारणी व्यस्त, त्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही-बाबा आढाव
- जनताच कुंभकर्णासारखी झोपलीये, मी एकटाच कधीपर्यंत लढू? – अण्णा हजारे
- देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्या बंद दाराआड भेटीवर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
- ‘जे काही घडलं.. आता आमच्यासाठी हा विषय संपला आहे’, बदलत्या राजकीय वातावरणावर आदित्य ठाकरेंचे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
