Share

सायबर गुन्ह्याला आळा बसण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाची नवी योजना

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  कोरोना साथीच्या कालावधीत देशात लॉकडाउन लागू करण्यात आल्याने लोकांकडून बाहेर जाणे टाळण्यासाठी ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाईन ट्रांजेक्शन, त्याचबरोबर अनेकदा ग्राहक वेगवेगळ्या ऑफिसला देखील बळी पडत असतात. याचा फायदा अनेक सायबर गुन्हेगारांकडूनही घेतला जात असल्याच्या अनेक घटना आपल्या समोर येत आहेत. त्यामुळे अनेक लोक सायबर गुन्ह्यामध्ये अडकली जातात. त्यामुळे आता या गोष्टीला आळा घालण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने एक पाउल पुढे टाकले आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने नॅशनल हेल्पलाईन नंबर १५५२६० आणि रिपोर्टिंग प्लॅटफॉर्म सुरू केले आहेत. सायबर गुन्ह्यबाबत एखाद्या व्यक्तीला तक्रार दाखल करायची हेल्पलाईन नंबर १५५२६० आणि रिपोर्टिंग प्लॅटफॉर्म याचा वापर केला जाऊ शकतो. या सुविधेमुळे पोलीस आणि बँकांना दिलासा मिळाला आहे. यामुळे त्वरित कारवाई करण्यास मदत होते. तसेच तुम्ही हेल्पलाईनशिवाय वेबसाईट https://cybercrime.gov.i/ वरही तक्रार नोंदवू शकता.

१ एप्रिल २०२१ ला हेल्पलाईनला लॉचिंग करण्यात आले होते. हेल्पलाईन १५५२६० आणि याच्या रिपोर्टिंग प्लॅटफॉर्मला गृहमंत्रालयानुसार भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने भारतीय रिझवर्ह बँक, सर्व मोठ्या बँका, पेमेंट बँका, वॉलेट आणि ऑनलाईन मर्चेंडच्या साहाय्याने चालू केले आहे. सध्या ही हेल्पलाईन छत्तीसगड, दिल्ली, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश या सात राज्यात आणि इतर केंद्रशासित प्रदेशात वापरण्यासाठी सुरु करण्यात आली आहे.

हेल्पलाईन आणि प्लॅटफॉर्ममुळे काय मदत होऊ शकते?

  • सायबर फसवणूकीचा शिकार झालेले हेल्पलाईन नंबर १५५२६० वर संपर्क साधतात आणि पोलिसांना माहिती देतात.
  •  पोलीस ऑनलाईन ऑपरेटरद्वारे चोरट्यांबद्दल कॉल रेकॉर्डच्या सहाय्याने माहिती गोळा करतात.
  •  हे तिकिट संबंधित बँका, वॉलेट्स, मर्चेंडपर्यंत पोहोचवतात. यावरुन खातेदाराचे पैसे बँक किंवा वॉलेट कशामधून गेले आहे हे कळते.
  •  तक्रारीच्या एकनॉलेजमेन्ट नंबरसह खातेदाराला एक SMS पाठवला जातो. ज्यामध्ये एकनॉलेजमेंट नंबरचा वापर करुन २४ तासांच्या आत फसवणूकीची संपूर्ण माहिती राष्ट्रीय सायबर गुन्हे रिपोर्टिंग पोर्टलवर https://cybercrime.Gov.In/ जमा करण्याचे निर्देश दिले जातात.
  • संबंधित बँक, रिपोर्टिंग पोर्टलवर आपल्या डॅशबोर्डवर हे तिकिट पाहू शकता. जर फसवणूक केले पैसे तिथे अडकले असतील किंवा निघाले नसतील तर त्याला लगेच ब्लॉक केले जाते. यामुळे हे चोर त्या खात्यातून पैसे काढू शकत नाही.
  • जर फसवणूकीचा पैसा दुसऱ्या खात्यात गेला, तर तिकिटाची पुढील बँकेत वाढ होते. ही प्रक्रिया तोपर्यंत सुरु असते जोपर्यंत पैसा फसवणूकदारांच्या हातून जाण्यापासून थांबवले जात नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!