नवी दिल्ली – उत्तर-पूर्व दिल्लीतील हिंसाचाराच्या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या जेएनयू विद्यापीठाच्या विद्यार्थी देवांगना कालिता, नताशा नरवाल आणि जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठाचा विद्यार्थी आसिफ इकबाल यांना गुरुवारी जामीन मंजूर करण्यात आला आहे.
नरवाल आणि कलिता यांना 15 जून रोजी दिल्ली हायकोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करत दिल्लीच्या तिहार तुरुंग प्रशासनाने दोघींनाही आज (गुरुवार, 17 जून) सायंकाळी बाहेर सोडलं. न्यायमूर्ती सिद्धार्थ मृदुल आणि न्यायमूर्ती ए.जे. भंभानी यांच्या खंडपीठाने या तिघांचाही जामीन मंजूर केला आहे. 50 हजारांच्या जामीनावर या तिघांचीही सुटका करण्यात आली आहे.
कोर्टाच्या सरकारला कानपिचक्या
सीएए कायद्याविरोधात आंदोलनात या तिघांचे निदर्शने करण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य करत व सत्तेला विरोध करणे म्हणजे दहशतवादाला उत्तेजन देणे नाही, असे स्पष्ट करत दिल्ली उच्च न्यायालयाने तिघांचा जामीन मंजूर केला होता.
एखाद्याला ‘दहशतवादी’ ठरवण्याआधी गांभीर्याने विचार करा अशी सूचना दिल्ली हायकोर्टाने दहशतवाद विरोधी कायदा – UAPAच्या दुरुपयोगाविषयी काळजी व्यक्त करताना सरकारला दिली आहे. असहमती वा मतभेद दाबून टाकण्यासाठी कायद्याचा वापर करण्यात आल्याचं वाटत असल्याचं कोर्टाने म्हटलंय.
विरोध दडपण्याच्या इर्षेतून सरकारने आंदोलनाचा अधिकार आणि दहशतवादी कारवाया यामधील सीमारेषा पुसट केली आहे. अशी मानसिकता बळकट होऊ लागल्यास तो लोकशाहीसाठी दु:खदायक दिवस असेल’ असं या विद्यार्थ्यांना जामीन मंजूर करताना दिल्ली उच्च न्यायालयानं म्हटलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
- न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी कर्णधार विराटाचे मोठे वक्त्यव्य, म्हणाला…
- वैजापूरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभापतींसह, तीन संचालकांना ‘या’ कारणामुळे नोटीसा, राजकीय वर्तुळात खळबळ!
- सुपर न्यूमररी ते युवकांवरील गुन्हे; मराठा आरक्षणाच्या बैठकीनंतर राज्य सरकारची महत्वाची भूमिका !
- आदित्य ठाकरेंच्या पुढाकाराने मुंबई, पुणे, नागपूरसह औरंगाबादचा रेस टू झिरो मोहिमेत सहभाग!
- …जेव्हा गँगस्टर नातीला खेळवतो! अरुण गवळीचा फोटो होतोय व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

