औरंगाबाद : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले व प्राथमिक शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जैस्वाल यांचा विश्वास फाउंडेशन व शिक्षण संस्था महामंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी कन्नडचे मा. आ. किशोर पाटील, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे राज्य सरचिटणीस एस. पी. जवळकर, विभागीय सचिव वाल्मीक सुरासे, राजेंद्र खंडेलवाल, मिर्झा सलीम बेग, योगेश पाटील यांची उपस्थिती होती.
डॉ. गोंदवले हे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाल्यापासून त्यांनी अनेक कल्पक उपक्रम जिल्ह्यामध्ये राबवले. त्यामध्ये झकास पठार, डिजिटल स्कूल अशा बऱ्याच योजनांचा समावेश आहे. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून हा गौरव करण्यात आला असल्याचे एस. पी. जवळकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले.
येत्या ३० जून रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी सुरज प्रसाद जयस्वाल हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनीही आपल्या काळात शिक्षणाभिमुख अनेक स्तुत्य उपक्रम हाती घेतले. त्यामुळे विश्व फाउंडेशनच्या वतीने त्यांना सेवागौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी किशोर पाटील म्हणाले की, डॉ. गोंदवले यांनी शिक्षणाधिकारी व शिक्षक यांना सोबत घेऊन वाळूज परिसरात कोव्हीड १९ अंतर्गत उल्लेखनीय कार्य केले.
तसेच शाळा सी. एस. आर. मधून डिजीटल केल्या. जिल्ह्यात घरकुल योजना प्रभावीपणे राबवल्या म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. शिक्षणाधिकारी जयस्वाल या महिनाअखेर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी कायमस्वरूपी विद्यार्थी उपयोगी उपक्रम राबविले. सत्काराला उत्तर देताना मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी विश्व फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ यांचे आभार मानले.
महत्त्वाच्या बातम्या
- न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी कर्णधार विराटाचे मोठे वक्त्यव्य, म्हणाला…
- वैजापूरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभापतींसह, तीन संचालकांना ‘या’ कारणामुळे नोटीसा, राजकीय वर्तुळात खळबळ!
- सुपर न्यूमररी ते युवकांवरील गुन्हे; मराठा आरक्षणाच्या बैठकीनंतर राज्य सरकारची महत्वाची भूमिका !
- आदित्य ठाकरेंच्या पुढाकाराने मुंबई, पुणे, नागपूरसह औरंगाबादचा रेस टू झिरो मोहिमेत सहभाग!
- …जेव्हा गँगस्टर नातीला खेळवतो! अरुण गवळीचा फोटो होतोय व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
