Share

‘तुम्ही काळजी करू नका, आमचं व्यवस्थित सुरुये!’, आघाडीत बिघाडीच्या चर्चेवर अजितदादांचे स्पष्टीकरण

Published On: 

औरंगाबाद : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना काँग्रेसने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार केल्याने राजकीय पटलावर त्याचे जोरदार पडसाद उमटत आहेत. काँग्रेस स्वबळावर लढणार असेल तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढतील, अशी भूमिका शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडली असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या भूमिकेचे समर्थन केले आहे.

दरम्यान, औरंगाबाद येथे आज पत्रकारांनी या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली. यावर पवार म्हणाले की, ‘तुम्ही काही काळजी करु नका. कोणी कोणाबरोबर चर्चा करत असलं तरी देखील सध्या सरकार व्यवस्थितपणे सुरू आहे.

अजित पवार हे आज बीड आणि उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहेत. त्यापूर्वी औरंगाबाद येथील विमानतळावरुन रवाना होताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले, की प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला इतरांशी चर्चा करण्याचा अधिकार आहे. हे लोकशाहीचे लक्षण आहे. लोकशाहीमध्ये या सर्व घटना घडत असतात.

परंतु नाना पटोले जरी चर्चा करत असले तरी त्यांनी स्पष्ट सांगितलं, की आघाडी सरकार व्यवस्थित काम करतयं. आम्ही त्या सरकारच्या पाठीशी आहोत. अस काँग्रेसने सांगितलं. राष्ट्रवादीने आणि शिवसेनेनेही सांगितलं आहे. सध्या कुठल्याही निवडणुका नसल्यामुळे त्यावर फार चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!