Share

नितीन गडकरींना धक्का! अमरावतीचे डॉ.सुनील देशमुख काँग्रेसमध्ये

Published On: 

नागपूर : महाविकास आघाडी सरकार पडण्याऐवजी मजबूत होत असल्याचे पाहून काठावर असलेले अनेक अस्वस्थ नेते आता स्वगृही परतण्याकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र आहे. अमरावतीचे डॉ. सुनील देशमुख यांच्या काँग्रेसमध्ये परतण्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धक्का बसल्याची चर्चा आता जोर धरत आहे. देशमुख यांची काँग्रेस महाराष्ट्र कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता असून त्यांना मध्य प्रदेश प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवणार असल्याची माहिती आहे.

२०१४ मध्ये ऐन विधानसभा निवडणुकीच्या अगदी आदल्या दिवशी नितीन गडकरींनी डॉ. सुनील देशमुख यांना भाजपात आणून तिकीट दिले. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात त्यांना मंत्रिपद द्यावे म्हणून गडकरी आग्रही होते. पण, फडणवीसांनी पद्धतशीरपणे डॉ. सुनील देशमुख यांना दूर ठेवले होते.

११ जून रोजी अमरावतीत मुक्कामी असणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी डॉ. सुनील देशमुख यांची भेट घेतली होती. 11 जूनच्या रात्री शहरातील एका व्यक्तीकडे नाना पटोले आणि डॉ. सुनील देशमुख या दोघांना जेवण होते. यावेळीच डॉ. सुनील देशमुख यांचा कांग्रेस प्रवेश निश्चित झाला. नाना पटोले आणि मी चांगले मित्र आहोत. १९९९ मध्ये मी आणि नाना पटोले दोघेही पहिल्यांदा निवडून आलो. तेव्हापासून आमची मैत्री आल्याचे डॉ. सुनील देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव
सुनील देशमुख हे २००४ साली अमरावती विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थराज्यमंत्री होते. त्याशिवाय, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपनं त्यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी देखील सोपवली होती. २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर अमरावती मतदारसंघातून त्यांनी कॉंग्रेसचे उमेदवार रावसाहेब शेखावत यांचा पराभव केला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार सुलभा संजय घोडके यांनी सुनील देशमुख यांचा पराभव केला.

या कारणामुळे घरवापसी
राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून भाजपला धक्के बसत आहेत. पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील पराभव, सांगली व जळगाव महापालिकेची सत्ता हातातून निसटल्यामुळं भाजपमध्ये अस्वस्थता आहे. पुन्हा सत्ता मिळण्याची चिन्हं नसल्यानं निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये आलेले अनेक नेते व आमदार अस्वस्थ आहेत. त्यातूनच आता घरवापसी सुरू झाली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!