🕒 1 min read
नवी दिल्ली- केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील अनेक बड्या मंत्र्यांनी आपले राजीनामे राष्ट्रपतींकडे सोपवले आहेत. दुसऱ्या बाजूला आज एकूण 43 जणांचा शपथविधी पार पडणार आहे. या यादीवर नजर टाकली, तर त्यात 4 माजी मुख्यमंत्र्यांचा आणि 18 माजी राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.
Union Health Minister Dr Harsh Vardhan resigns from Union Cabinet, ahead of #CabinetReshuffle
(File pic) pic.twitter.com/Iv63Isu7UK
— ANI (@ANI) July 7, 2021
सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे या यादीत 13 वकिल, 6 डॉक्टर्स आणि 5 इंजिनिअर्स यांचा समावेश आहे. तर या यादीतील पाच जण हे एकेकाळी शासकीय नोकर असल्याचंही स्पष्ट होत आहे. दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आहे. या विस्तारात नवीन आणि तरुण चेहऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी संधी देणार असल्याची चर्चा आहे.
राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांच्या यादीत अनेक मोठी नावे असल्याने याविषयी जोरदार चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतं. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, कामगार मंत्री संतोष गंगवार, खते व रसायनमंत्री सदानंद गौडा यांनी आपले राजीनामे राष्ट्रपतींकडे पाठवून दिले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांच्या खात्यात बदल होणार असल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जातं. त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. कोरोना परिस्थिती हाताळण्यात हर्षवर्धन यांना अपयश आल्याने त्यांच्याकडून आरोग्य खातं काढून घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. आरोग्य खात्याची जबाबदारी अनुभवी नेत्याकडे देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतं.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोदी सरकारविरोधात प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते. त्याचा फटका डॉ. हर्षवर्धन यांना बसला आहे. हर्षवर्धन यांच्याकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा कारभारही होता. आता हर्षवर्धन यांच्या राजीनाम्यानं २ मंत्रालये रिक्त झाले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या दरम्यान, हर्षवर्धन यांना चमकदार कामगिरी करता आला नसल्याचा विरोधक आरोप करत होते या पार्श्वभूमीवर त्यांचा राजीनामा हे या आरोपांवर शिक्कामोर्तब आहे का असा देखील सवाल उपस्थित होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘जे तीस वर्षात झालं नाही ते आता काय होणार ?’; भाजपच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंच भाष्य
- राष्ट्रवादीच्या नेत्याचे शिवसेनेच्या मंत्र्यांवर गंभीर आरोप, लाचलुचपत विभागाकडे केली तक्रार
- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपने नेमकं काय कमावलं आणि काय गमावलं ?
- पालखीस परवानगी नाकारली, महाराजांचा वारकर्यांसहित आत्मदहनाचा इशारा!
- अधिवेशन संपले तरीही अडचणी सुरूच; मुख्यमंत्र्यांच्या समोर आता नवे आव्हान काय असणार ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
