Share

२०२१ हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी!

Published On: 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने २०२१ हंगामासाठी सुक्या खोबऱ्याच्या किमान आधारभूत किंमतीला (एमएसपी) मान्यता दिली आहे. तेल काढण्याच्या घाणीसाठी उपयुक्त उत्तम सरासरी गुणवत्ता (एफएक्यू) असलेल्या खोबऱ्याच्या एमएसपी मध्ये ३७५ रुपये वाढ करण्यात आली आहे जी २०२० च्या प्रति क्विंटल 9960 रुपयांवरून वाढवून २०२१ हंगामासाठी १०३३५ रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे.

अख्ख्या नारळासाठी २०२० हंगामात असलेला १०,३०० रुपये प्रति क्विंटल किमान आधारभूत किंमत ३०० रुपयांनी वाढवून २०२१ हंगामात १०,६००/ – रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे. अखिल भारतीय सरासरी उत्पादन खर्चापेक्षा घोषित झालेला किमान आधारभूत किंमत खोबऱ्यासाठी ५१.८७ टक्के आणि अख्ख्या नारळासाठी ५५.७६ टक्के परतावा मिळवून देतो.

कृषी खर्च व मूल्य आयोगाच्या (सीएसीपी) शिफारसींवर आधारित ही मंजुरी आहे.सरकारने २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात जाहीर केल्यानुसार सन २०२१ च्या हंगामात खोबऱ्यासाठी किमान आधारभूत किंमतीमधील वाढ अखिल भारतीय सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान पट १.५  पातळीवर एमएसपी निश्चित करण्याच्या तत्त्वानुसार आहे.२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने किमान ५० टक्के नफा सुनिश्चित करणे हे महत्त्वपूर्ण आणि प्रगतिशील पाऊल आहे.

भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ लिमिटेड (नाफेड) आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ (एनसीसीएफ) हे नारळ उत्पादक राज्यांतील एमएसपी आधारभूत कार्ये करण्यासाठी केंद्रीय नोडल एजन्सी म्हणून काम करत राहतील.सन २०२० च्या हंगामात सरकारने ५०५३.३४ टन नारळ आणि ३५.५८ टन खोबऱ्याची खरेदी केली असून त्याचा फायदा ४,८९६ नारळ उत्पादकांना झाला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!