Share

शिवसेनेचा भाजपला आणखी एक धक्का; भाजपच्या माजी सचिवाने मातोश्रीत बांधलं शिवबंधन !

Published On: 

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांना अद्यापही वर्षभराचा अवधी असताना मुंबईतील स्थानिक राजकीय हालचालींना वेग आला आहे. नवी मुंबईतील अनेक नागरसेवकांनी भाजपला सोडचिट्ठी देत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली असतानाच आता मुंबई भाजपच्या माजी सचिवांनी हाती शिवबंधन बांधलं आहे.

मुंबई भाजपचे माजी सचिव समीर देसाई यांनी भाजपला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला आहे. समीर देसाई हे काँग्रेसचे माजी खासदार गुरूदास कामत यांचे भाचे आहेत. तसंच ते काँग्रेसचे माजी नगरसेवकही होते. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी आता शिवसेनेची वाट धरल्याचे समोर येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्ष प्रवेश पार पडला.

२०१४ देशभरात भाजपला प्रचंड यश मिळालं. महाराष्ट्रात देखील भाजपने सत्ता स्थावपण केली होती. या काळात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह शिवसेनेतील काही नेत्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी देखील भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु होती. आता, राज्यातील सत्ता महाविकास आघाडीकडे गेल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी भाजपला सोडचिट्ठी दिल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, येत्या काळात अनेक भाजपा आमदार महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये प्रवेश करतील असं भाकीत नेत्यांकडून करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!